Press "Enter" to skip to content

मेडिकल जिहाद? डॉ. इम्तियाज हा मुस्लिम डॉक्टर हिंदू बालकांना गर्भातच मारून टाकायचा?

राजस्थानमधील जोधपुर येथील डॉ. इम्तियाजला (Dr. Imtiaz) अटक झाल्याच्या बातमीचा स्क्रिनशॉट सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. दावा केला जातोय की हा मुस्लिम डॉक्टर हिंदू बालकांना गर्भातच मारून टाकायचा. यास ‘मेडिकल जिहाद’ असे नाव देण्यात आले आहे.

Advertisement

व्हायरल दाव्यात ‘मेडिकल जिहाद: गर्भ में ही हिंदू बच्चों को मार देता था डॉक्टर इम्तियाज़…!’ या अशा कॅप्शन खाली ‘#गजवा_ए_हिंद‘ असा हॅश टॅग वापरला जातोय. ‘गजवा_ए_हिंद’ म्हणजे गैर मुस्लिमांना मारून मुस्लीम राज्य प्रस्थापित करण्याची मोहीम.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

Dr Imtiyaz used to kill hindu kids in foetus viral claims on FB
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यात दिसणाऱ्या एशियानेट न्यूजची मूळ बातमी शोधून व्यवस्थित वाचली. डॉ. इम्तियाज (Dr. Imtiaz) अवैधरित्या गर्भलिंगनिदान करताना पोलिसांच्या सापळ्यात रंगेहाथ सापडला. त्याची सोनोग्राफी मशीन जप्त केली असून त्यावर कायदेशीर कारवाई होत असल्याची ती बातमी आहे. एशियानेट न्यूजने या विषयाशी संबंधित ३ वेगवेगळ्या सखोल बातम्या केल्या आहेत. या तिन्ही बातम्यांमध्ये आरोपी डॉक्टरने जाणीवपूर्वक केवळ हिंदू अर्भकांना मारल्याचा कुठेही उल्लेख नाही.

अधिक शोधाशोध केली असता २३ एप्रिल २०२२ रोजी युट्युबवर अपलोड करण्यात आलेली न्यूज१८ राजस्थानची बातमी बघायला मिळाली. यामध्ये पोलीस निरीक्षक जितेंद्र गंगवानी यांची प्रतिक्रिया देखील आहे. यामध्येही कुठे आरोपी डॉक्टर इम्तियाज केवळ हिंदू बालकांना मारत असल्याचा उल्लेख नाही. याउलट डॉक्टरला सहकार्य करणाऱ्या भंवरलाल जहांगीरचाही यात उल्लेख आहे. या नावावरून अर्थातच हा हिंदू असल्याचे लक्षात येते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की जोधपुर येथील डॉ. इम्तियाजला अवैधरित्या गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या आरोपाखाली अटक झाली आहे. तो करत असलेला गुन्हा नक्कीच गंभीर स्वरूपाचा आहे, परंतु व्हायरल दाव्यांत सांगितल्याप्रमाणे तो केवळ हिंदू बालकांना मारत असल्याची बाब फेक आहे.

त्याच्या साथीला भंवरलाल जहांगीर नामक हिंदू व्यक्तीही काम करत होता, त्यासही अटक झाली आहे. एकूणच घटनेला हिंदू-मुस्लीम रंग देऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट होतेय.

हेही वाचा: मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जातेय बंदुक चालविण्याचे प्रशिक्षण? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा