Press "Enter" to skip to content

हिजाब विवाद: ‘बुरखा गर्ल’ कन्हैय्या कुमारच्या कथित ‘टुकडे टुकडे गँग’ची सदस्य असल्याचे व्हायरल दावे फेक!

कर्नाटकातील हिजाब विवादात हिंदू आंदोलकांच्या विरोधाला धीराने जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या ‘बुरखा गर्ल’चा व्हिडीओ व्हायरल झाला. तिच्या या एकूणच कृत्यामागे कन्हैय्या कुमार आणि इतर ‘वामपंथी’ ‘टुकडे टुकडे गँग’चा हात असल्याचे दावे व्हायरल होतायेत. यासाठी एक फोटोही शेअर केला जातोय. हिजाब ही एक ‘टूल कीट’ असल्याचं सांगितलं जातंय.

Advertisement

जिग्नेश मेवानी, कन्हैय्या कुमार, अभिनेते प्रकाश राज, उमर खालिद यांसारखे डाव्या विचारांचे नेते असणाऱ्या ग्रुप फोटोमध्ये एका मुलीच्या भोवती हिरव्या रंगाने खुण करून ठेवलीय आणि ही तीच ‘बुरखा गर्ल’ असल्याचे दावे होतायेत.

ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हेच दावे जोरदार व्हायरल होतायेत.

पडताळणी:

या आधीही कर्नाटकातील हिजाब विवादात व्हायरल झालेल्या व्हिडीओतील मुलीविषयी अनेक दावे झाले आहेत, त्यांची पडताळणी ‘चेकपोस्ट मराठी’ने केली आहे. गुगल रिव्हर्स इमेजसर्चच्या मदतीने तपासले असता व्हायरल होत असलेला फोटो नजमा नजीर (Najma Nazeer) या युवतीचा असल्याचे समजले. नजमा कर्नाटकच्या ‘जनता दल सेक्युलर’ पक्षाची सदस्य आहे.

सदर फोटो फेसबुकवर ३१ डिसेंबर २०१९ रोजी अपलोड केला गेलाय.

Najma Najir Chikkanarale with kanhaiyya kumar parakash raj
Source: Facebook

‘बुरखा गर्ल’चे नाव नजमा, नव्हे मुस्कान

इंडियन एक्स्प्रेसने तो व्हिडीओ व्हायरल झाला त्याच दिवशी त्या मुलीची भेट घेतली आणि काही प्रश्न विचारले होते. त्यातून तिची माहिती समोर आली. तिचे नाव मुस्कान खान (Muskan Khan) असून ती जिथे हा एकूण प्रकार घडलाय त्या कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात असणाऱ्या पीईएस कॉलेज मध्ये ती बी.कॉम शिकतेय.

Source: Indian Express

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ‘बुरखा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या व्हायरल व्हिडीओतील मुलीचे नाव मुस्कान आहे. डाव्या विचारसरणीच्या नेत्यांसह व्हायरल होणाऱ्या फोटोतील युवती नजमा नजीर आहे. या दोन्ही मुली वेगवेगळ्या आहेत. याचाच अर्थ हिंदू आंदोलकांना प्रत्युत्तर देणाऱ्या मुलीच्या एकूण वागण्यामागे कथित ‘टुकडे टुकडे गँग’चा हात असल्याचे दावे निराधार आहे.

हेही वाचा: हिजाब विवाद: राहुल गांधींसोबत दिसणारी ती महिला व्हायरल व्हिडिओतील मुस्कान नाही!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा