कर्नाटकमध्ये जैन मुनींवर मुस्लीम गटाने (muslim youth) हल्ला केला, त्यांना जबर मारहाण केली आणि कॉंग्रेस जिंदाबादचे नारे लावले. अशा प्रकारचे दावे करत एका जखमी जैन मुनींचा (jain sage) फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.
व्हायरल मजकूर:
कर्नाटक में जैन मुनि को मुसलमानों ने मारा कहा कांग्रेस जिन्दाबाद के लगाये नारे अब कांग्रेस अपने असली रूप में आ गई कांग्रेस को वोट देने वाले हिन्दुओं इसी तरह का प्यार तुम्हें कांग्रेस देती रहेगी । इस फोटो को ईतना भेजो की कल तक नरेंद्र मोदी जी और योगी जी के पास पहुंच जाऐ। आज मौका मिला है कुछ पुण्ये का काम करने का। कोई मुसलमान ही होगा जो इस वीडियो को शेयर नहीं करेगा आप सभी को भगवान की कसम।
फेसबुक, ट्विटरसह व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रदीप कडू, चंद्रकांत कापुरे, शैलेश चौधरी, जिजाभाऊ आणि प्रशांत यमजाल यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल इमेज गुगल रिव्हर्स सर्च केली असता असे लक्षात आले की हे दावे २०१८ सालापासून व्हायरल होत आहेत. याचेच मूळ शोधत असताना ‘पोस्ट कार्ड’ नावाच्या न्यूज पोर्टलने ही बातमी सर्वात आधी पोस्ट केली होती असे समजले.
यामध्ये कॉंग्रेसचा उल्लेख नाही परंतु सदर हल्ला मुस्लीम युवकांनी (muslim youth) केला असल्याचा दावा त्यात आहे. याची पुनर्पडताळणी करत असताना ‘अल्ट न्यूज’ने प्रकाशित केलेला १३ मार्च २०१८ सालचा रिपोर्ट आम्हाला मिळाला. यामध्ये त्यांनी ‘अहिंसा क्रांती’ या जैन धर्मविषयक बातम्या देणाऱ्या पोर्टलच्या एका बातमीचा संदर्भ घेतला आहे. या बातमीनुसार ‘उपाध्याय मयंकसागर या जैन मुनींना (jain sage) मोटरसायकलस्वाराने धडक दिली, या अपघातात ते जखमी झाले होते.’ या बातमीची त्यांनी या न्यूज पोर्टलचे संपादक मुकेश जैन यांच्याशी संपर्क साधून खातरजमा करून घेतली होती.
‘चेकपोस्ट मराठी’ने स्वतंत्रपणे या सर्वच बाबींची खातरजमा केली असता ‘डेक्कन क्रॉनिकल‘ची ३१ मार्च २०१८ रोजीची एक बातमी सापडली. ‘ जैन मुनी मयांक सागर यांच्या अपघाताला धार्मिक रंग देत फेक न्यूज पसरवल्या प्रकरणी पोस्टकार्ड न्यूजचे संस्थापक महेश विक्रम हेगडे यांना अटक झाली’ या आशयाची ती बातमी आहे.
बातमीमध्ये असाही उल्लेख आहे की या महेश हेगडे यांना ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत आहेत. अटकेनंतर भाजप समर्थकांनी सोशल मीडियात #ReleaseMaheshHegde असा ट्रेंड चालवला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल दावे फेक आहेत. जैन मुनी (jain sage) मयांक सागर यांना मुस्लीम युवक (muslim youth) किंवा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली नाही, त्यांना मोटारसायकलचालकाने ठोकर दिल्याने अपघातात ते जखमी झाले होते.
हेही वाचा: ‘जावेद’ दहा हजार सिमकार्ड विकत घेऊन सोशल मिडियात धार्मिक तेढ पसरवत होता?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]