Press "Enter" to skip to content

ट्रेनच्या हॉर्नमुळे नमाज पठनात अडथळा येत असल्याने मुस्लिमांची चालत्या ट्रेनवर दगडफेक?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक एका ट्रेनवर दगडफेक करताना दिसताहेत. हा व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की ट्रेनच्या हॉर्नमुळे नमाजमध्ये अडथळा येत असल्याने मुस्लिम समुदायातील लोकांनी चालत्या ट्रेनवर दगडफेक केली.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला ‘ईटीव्ही भारत’च्या वेबसाईटवर 13 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार व्हिडीओ चेन्नईतील पेरांबूर रेल्वे स्थानकावर (Perambur Railway Station) विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये एकमेकांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा आहे.

ETV Bharat news screengrab
Source: ETV Bharat

‘ईटीव्ही भारत’च्या बातमीनुसार चेन्नईतील पेरांबूर रेल्वे स्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी ट्रेनवर दगडफेक केली. यामुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. पचयप्पा कॉलेजचे (Pachaiyappa’s College) विद्यार्थी अरक्कोनमकडे जाणाऱ्या ट्रेनमधून तर स्टेट कॉलेजचे (State College) विद्यार्थी तिरुपती एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होते.

‘झी न्यूज तमिळ’च्या वेबसाईटवर देखील या घटनेची बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार स्टेट कॉलेज आणि पचयप्पा कॉलेजच्या 20 हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी 15 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर कॉलेज प्रशासन आणि त्यांच्या पालकांना याविषयी माहिती देण्यात आली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओचा आणि नमाज पठनाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. दोन वेगवेगळ्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या झटापटीचा व्हिडीओ धार्मिक द्वेष पसरविण्याचा उद्देश्याने चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.

हेही वाचा- राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या कृपेने मंदिरात नमाज पढले जातेय? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा