Press "Enter" to skip to content

मुस्लिम असल्या कारणाने चालवली गेली उज्जैनमधील मांजा विक्रेत्याच्या घरावर जेसीबी?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एका जेसीबीच्या साहाय्याने घर पाडले जात असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की व्हिडीओ मध्य प्रदेशातील उज्जैन येथील असून तेथे चायनीज मांज्यामुळे एका विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने मांजा विक्रेत्या ‘अब्दुल वहाब’ (Abdul Wahhab) या दुकानदाराचे घर अतिक्रमण असल्याचे सांगत त्यावर जेसीबी चालवली. केवळ मुस्लिम असल्या कारणाने व्यापाऱ्याला लक्ष्य बनविण्यात आले.

Advertisement

पत्रकार अहमद खबीर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ ट्विट केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

गेल्या शनिवारी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये नेहा अंजना (Neha Anjana) नावाच्या 20 वर्षीय विद्यार्थिनीला चायनीज मांज्यामुळे जीव गमवावा लागला. चायनीज मांज्यामुळे गळा कापला गेल्याने स्कूटरवरून जात असलेली नेहा मृत्यमुखी पडली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेची दखल घेत याप्रकरणी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने चायनीज मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली.

दैनिक भास्करच्या बातमीनुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम अब्दुल वहाबच्या घरासमोरील अतिक्रमण हटवले. त्यानंतर शास्त्रीनगर येथील रहिवासी विवेक भावसारच्या घराचा बेकायदा भागही तोडण्यात आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी चायनीज मांजा विकणारा तिसरा व्यापारी इंदोरी गेट येथील रहिवासी ऋतिक जाधवचे अतिक्रमण देखील हटविले.

मध्य प्रदेशात चायनीज मांज्यावर बंदी असून राज्यात इतरही कुठे चायनीज मांजा विकला जात असल्याची माहिती मिळाल्यास उज्जैनमधील कारवाई प्रमाणेच कारवाई केली जाईल, असा इशारा देखील राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मांजा व्यापाऱ्यांवरील पोलीस कारवाईचा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. पोलिसांनी बंदी असलेल्या चायनीज मांज्याच्या विक्री प्रकरणी तीन व्यापाऱ्यांच्या अवैध बांधकामांवर कारवाई केली आहे. यामध्ये एका मुस्लिम आणि दोन हिंदू व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

केवळ मुस्लिम असल्या कारणाने मुस्लिम व्यापाऱ्याच्या दुकानावर जेसीबी चालविण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत.

हेही वाचा- केरळी मुस्लिमांनी ‘युनायटेड मल्लापूरम’ असा वेगळा देश घोषित करून स्वतःचा पंतप्रधान निवडल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा