Press "Enter" to skip to content

‘आर्यन खान’ने नशेतच विमानतळावर सर्वांसमोर मुत्रविसर्जन केल्याचे दावे फेक! वाचा सत्य!

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan) पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. विमानतळावर एक युवक प्रतिक्षाकशात सर्वांसमोर लघवी करताना दिसतोय. दावा केला जातोय की तो आर्यन खानच आहे.

Advertisement

आर्यन खान अमेरिका के एयरपोर्ट पर शाहरुख खान के बेटे विदेशों में बाप और देश का नाम डूबा रहें हैं ! “लानत है ऐसे लोगों पर !‘ या अशा कॅप्शनसह साधारण १.३५ मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Source: Twitter

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप अशा सर्वच माध्यमांत हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक जॉन चाको, दत्तू गवाणकर, निसार अली, जगदीश काबरे, अशोक किरदत आणि संजय राजवाडकर यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनीत अनगळ यांनी व्हायरल दावा पडताळणीसाठी पाठवला आणि काही वेळाने त्यांनी स्वतःच डेलीमेल या ब्रिटीश वृत्तपत्राच्या २०१३ सालच्या एका बातमीचीही लिंक पाठवली.

सदर बातमीनुसार ‘ट्वायलाइट’या चित्रपटात काम केलेल्या ब्रोनसोन पेलेटीयर या अभिनेत्याचे हे कृत्य होते. २५ वर्षीय अभिनेत्याच्या जबाबानुसार त्याला त्याच्या एका चाहत्याने शीतपेय प्यायला दिले. त्यात कसलासा नशेचा पदार्थ होता. याच नशेत त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याच्या हातून हे कृत्य घडले. सार्वजनिक ठिकाणी नशा करणे आणि चुकीची वर्तणूक करणे अशा अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावे झाली. काही काळ अटक करून त्यास सोडून देण्यात आले.

Source: Daily Mail

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की विमानतळावर सर्वांच्या समोर मुत्र विसर्जन करणारा युवक अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान (aryan khan) नाही. तो ब्रोनसोन पेलेटीयर नामक अभिनेता आहे. तसेच हा व्हिडीओ आताचा नसून २०१३ सालचा आहे.

हेही वाचा: आर्यन खान ड्रग केस प्रकरणी अटक झालेल्यांमध्ये सर्व मुले मुस्लीम आणि मुली हिंदू आहेत? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा