Press "Enter" to skip to content

साई ट्रस्टद्वारे राम मंदिर निर्माण निधीला नकार पण मस्जिदींना ९६ कोटी दान? वाचा सत्य!

शिर्डी साई संस्थानने (Shirdi Sai trust) अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी दान देण्यास स्पष्ट नकार दिला परंतु मस्जिदींच्या निर्माण व डागडूजीसाठी तब्बल ९६ कोटी रुपयांचे दान दिलेय. ‘तुम्हारे ही चढ़ावा के धन से मस्जिद बन रहें हैं, आतंकवादी पल रहे हैं और तुम्हारा सर्वनाश कर रहे हैं।’ अशा प्रकारच्या मजकुराचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

Advertisement

व्हायरल दावा:

साईं ट्रस्ट के द्वारा 96 करोड़ मस्जिद के लिए दान।
लेकिन राम मंदिर निर्माण के लिए 1रूपया नहीं दिया गया।

अब भी नहीं समझे मुर्खों तो अफगान का हाल देख लो।
तुम्हारे ही चढ़ावा के धन से मस्जिद बन रहें हैं, आतंकवादी पल रहे हैं और तुम्हारा सर्वनाश कर रहे हैं।
वाह रे साईं तेरा षड़यंत्र, हिन्दू भूल रहे वैदिक मंत्र। और हम मुर्ख हिंदू साई के मंदिर में जाकर माथा टेकते हैं और चढ़ावा चढ़ाते हैसाईं बाबा की सच्चाई सभी सनातन धर्मियों को जाना चाहिए । किस तरह से साजिश के तहत हिंदू मंदिरों में साईं की मूर्तियां बैठाई जा रही है सावधान हो जाओ हिंदुओं और सच्चाई जानने का प्रयास करो ।

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दिग्विजय डुबल यांनी व्हॉट्सऍपवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा मेसेज आमच्या निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. हे असेच दावे फेसबुक आणि ट्विटरवर अनेक दिवसांपासून व्हायरल होतायेत.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यात उल्लेख असल्याप्रमाणे शिर्डी संस्थानाने (Shirdi Sai trust) मस्जिदीसाठी ९६ कोटी रुपये दान केले का? हे तपासण्यासाठी विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले परंतु अशी एकही बातमी आम्हाला सापडली नाही.

शिर्डी संस्थानाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आम्ही वार्षिक अहवाल तपासले. अपलोड केलेल्यांपैकी सर्वात ताज्या म्हणजेच २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अहवालात संस्थानाने पण क्रमांक ५८ वर नेमके कोणत्या गोष्टींसाठी किती रुपये दान केले आहेत हे सांगितले आहे.

एकूण दानाची रक्कम १०१ कोटी ४८ लाख रुपये एवढी आहे. त्यापैकी सर्वात मोठी ५१ कोटी रुपये रक्कम कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यक निधीसाठी देण्यात आलीय. यामध्ये कुठेही कोणत्या मस्जिदीचा उल्लेख नाही. किंबहुना सर्व दान सामाजिक कार्यांसाठीच आहेत कोणत्याही धर्मासाठी एकही रुपया दिल्याचे दिसत नाही.

Shirdi Sai trust donation report 2019-20
Source: Shirdi Sai Trust

संस्थानाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संवाद साधून आम्ही खात्री करून घेतली आहे की अशा प्रकारचे कुठलेही दान कोणत्याही धर्माच्या कार्यासाठी आतापर्यंत दिले नाही.

राम मंदिर निर्माणासाठी दान देण्यास शिर्डी संस्थानाचा नकार?

शिर्डी संस्थानाने ‘आमचे संस्थान हिंदू धर्मीय नसल्याने राम मंदिरास आम्ही दान देऊ शकत नाही’ असे उत्तर दिल्याचे दावे सोशल मीडियात अनेक दिवसांपासून व्हायरल होत होते. अयोध्या राम मंदिर निर्माणासाठी दान स्वीकारण्याची प्रोसेस १५ जानेवारीपासून सुरु झाली आणि हे असे दावे ५ जानेवारीपासून व्हायरल होतायेत यातच लक्षात येते की हे दावे किती खरे असतील.

सदर दाव्यांविषयी ‘द लल्लनटॉप‘ला संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

शिर्डी साई बाबांच्या दरबारात सर्व धर्मांचे लोक आस्थेने येतात. संस्थानाच्या निगराणीसाठी बनलेले हे ट्रस्ट ‘कायद्या’प्रमाणेच कार्य करते. ५० लाखाच्या वरचे कोणतेही मोठे दान किंवा खर्च करावयाचा असल्यास उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. राम मंदिर निर्माणासाठी दान देण्याविषयी एकही प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नाही. जर समितीसमोर हा प्रस्ताव आला असता आणि मग आम्ही त्यावर काहीएक निर्णय घेतला असता तर या दाव्यांना काही अर्थ असता परंतु आमच्याकडे अजून प्रस्तावच आला नाही, तेच हे असे दावे व्हायरल होणे हे चूक आहे. यांना कसलाही आधार नाही.

– अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी संस्थान

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार व्हायरल दाव्यातील दोन्ही बाबी फेक असल्याचे निष्पन्न झाले. शिर्डी साई संस्थानाने (Shirdi Sai trust) ना राम मंदिर निर्माणाकरिता दान देण्यास नकार दिलाय, ना कुठल्या मशिदीसाठी ९६ कोटीचे दान दिलेय. या अशा पोस्ट धार्मिक तेढ पसरवण्यासाठी खोडसाळपणे विशिष्ट विचारधारेच्या लोकांकडून तयार केल्या जातात.

हेही वाचा: देशात फक्त हिंदू मंदिरांनाच कर भरावा लागतो का? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा