Press "Enter" to skip to content

महाराणा प्रताप यांच्या शस्त्रांचे वजन ३०० किलो होते? जाणून घ्या सत्य!

भारताच्या गौरवशाली इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच अजरामर झालेलं नाव म्हणजे महाराणा प्रताप. त्यांच्या शौर्याची गाथा सांगणारे त्यांच्या शस्त्रास्त्रांचे वजन तब्बल ३००-४०० किलो असल्याचे दावे करताना आढळतात. तशा पोस्ट सोशल मीडियात सातत्याने पहायला मिळतात. (Maharana Pratap 300 kilo Gram)

Advertisement

कुणी लिहितं ‘महाराणा प्रताप का भाला ८१ किलो का और उनका कवच ७२ किलो का था’ कुणी म्हणतं ‘त्यांच्या २ तलवारींचे वजन २०८ किलो होते.’ तर कुणी दावा करतं-

“महाराणा प्रताप भारत के सबसे महान योद्धा में से एक थे. उनका कद ७ फिट ५ इंच था. वह ८० किलो का भाला, २०८ किलो की दो तलवारे और ७२ किलो के कवच के साथ युद्ध लढते थे. आज महाराणा प्रताप की जयंती है.”

Viral claims about Maharana Pratap_ checkpost marathi facts
Source: Facebook

या अशा ग्राफिक्ससह आणि मजकुरासह फेसबुक, ट्विटरवर मोठ्या प्रमाणात पोस्ट्स व्हायरल झाल्या आहेत.

पडताळणी:

महाराणा प्रताप यांच्या शौर्याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. वयाच्या २७ व्या वर्षी मुघलांशी हाथमिळवणी न करता अकबराविरुद्ध त्यांनी युद्ध केले होते. हे युद्ध ना अकबर जिंकला ना महाराणा प्रताप पण तो निकराचा लढा आजही महाराणा प्रतापांची गाथा सांगतो. परंतु (Maharana Pratap 300 kilo Gram) एवढ्या वजनाचे शस्त्र घेऊन लढणे काहीसे अतार्किक आहे म्हणून ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीचा प्रयत्न केला.

विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगलसर्च केल्यानंतर आम्हाला udaipurbeats या वेबसाईटवर महाराणा प्रताप यांच्याविषयीच्या महत्वाच्या फॅक्ट्स मिळाल्या. यावरील माहितीनुसार ‘सिटी पॅलेस उदयपुर’ येथे महाराणा प्रताप यांची शस्त्रास्त्रे ठेवली आहेत. ढाल, चिलखत, जिरेटोप, दोन तलवारी अशी शस्त्रे फोटोतही पहायला मिळत आहेत.

संग्रहालयातीलच माहिती फलकावर स्पष्टपणे असे लिहिले आहे की ‘यह प्रदर्शित महाराणा प्रताप प्रथम (१५७२-१५९७ ई) के कवच सहित निजी अस्त्र शस्त्रों का कुल वजन ३५ कि.ग्रा. है!’

maharana pratap weapons weight
Source: Udaipurbeats

या वेबसाईटवरील माहिती पुन्हा एकदा पडताळण्यासाठी आम्ही सर्च केले तेव्हा ‘द लल्लनटॉप’चा रिपोर्ट आमच्या हाती लागला. यात त्यांनी उदयपुर संग्रहालयाचे अधिकारी भूपेंद्रसिंह आउवा यांना सदरविषयी माहिती विचारली असता त्यांचं जे उत्तर आलं ते जश्यास तसं दिलं आहे.

” महाराणा प्रताप कोई विशालकाय मानुष नहीं थे. उनका कद करीब पांच फीट सात इंच रहा होगा. उनके भाले, ढाल, तलवार, छाती के कवच का भार कोई उतना नहीं, जितना लोग दावा कर रहे हैं. हमने 2003 में ये संग्रहालय तैयार किया था. और महाराणा प्रताप के इन सारे सामानों का हमने वजन करवाया था. फिर संग्रहालय में रखा था. साथ ही बोर्ड में बाकायदा लिखवाया भी था जिससे लोगों को जानकारी रहे कि सबका वजन कुल मिलाकर 35 किलोग्राम है. लेकिन पिछले कई सालों से उनके वजन को लेकर ये अफवाह उड़ती चली आ रही है.”

– भूपेंद्रसिंह आउवा (उदयपुर संग्रहालय अधिकारी)

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये महाराणा प्रताप यांच्या शस्त्रास्त्रांच्या वजनाविषयी (Maharana Pratap 300 kilo Gram) व्हायरल होत असलेले दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. ते वापरत असलेली शस्त्रास्त्रे एकूण ३५ किलो वजनाची आहेत, ३००-४०० किलो नव्हे.

हेही वाचा: ‘भारतीय राजाने ‘रोल्स रॉईस’ कारची बनवलेली कचरागाडी’ कहानी अच्छी है मगर सच्ची नहीं!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा