Press "Enter" to skip to content

उत्तर प्रदेशात दोन मुस्लिम मुलांकडून अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार?

सोशल मीडियावर एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराशी संबंधित बातमीचे क्लिपिंग व्हायरल होतेय. व्हायरल क्लिपिंगमध्ये उत्तर प्रदेशच्या बागपतमधील रमाला भागात दोन तरुणांनी एका 15 वर्षीय मुलीचे तिच्या घरातून अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती देण्यात आली आहे. ही क्लिपिंग शेअर करताना दावा केला जातोय की बलात्कार करणारी मुले मुस्लिम असून त्यांनी हिंदू मुलीवर बलात्कार केला आहे.

Advertisement

क्या बागपत पाक या अफगानिस्तान में है?? :-

“डरे हुए लोगो के काम 65% हिंदुओ वाले रामला गांव में पिता घर से बाहर थे।गांव के 2 जिहादी जबदस्ती हिन्दू घर मे घुसे, दिन दहाड़े 15 वर्षीय लड़की को अगवा कर साथ ले गए। रात भर लड़की से बलात्कार किया और सुबह उसको घर के पास छोड़ गए।” अशा दाव्यांसह ही क्लिपिंग शेअर करण्यात येतेय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल क्लिपिंगममधील बातमीचे पहिलेच वाक्य ‘रमाला क्षेत्र के एक गांव में दो युवक संप्रदाय विशेष की किशोरी को उसके घर से अगवा कर ले गए और सामूहिक दुष्कर्म किया’ असे आहे. यातील ‘संप्रदाय विशेष की किशोरी’ या शब्दावरून पीडित मुलगी हिंदू धर्मीय नाही, हे स्पष्ट होते.

घटना नेमकी कधीची आहे हे शोधण्यासाठी गुगलवर किवर्ड सर्च केलं असता दैनिक जागरणच्या वेबसाईटवर 29 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली. बातमीनुसार या प्रकरणी पोलिसांनी परमजीत सिंह आणि प्रशांत या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल, अशी माहिती इन्स्पेक्टर एनएस सिरोही यांनी दिली आहे.

पडताळणी दरम्यान आम्हाला बागपत पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 1 डिसेंबर रोजी करण्यात आलेले ट्विट देखील मिळाले. या ट्विटमध्ये बागपत पोलिसांनी दोन्ही आरोपी प्रशांत आणि परमजीतला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

बागपत पोलिसांनीच दुसऱ्या एका ट्विटच्या माध्यमातून सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांचे खंडन देखील केले आहे.

बागपतच्या रमाला भागाचे एसएचओ नवेन्द्र सिंह यांनी ‘आज तक’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडित मुलगी मुस्लिम समाजातील असून आरोपी हिंदू धर्मीय आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मुस्लिम तरुणांकडून अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार केला गेल्याचे दावे चुकीचे आहेत. वस्तुस्थिती अगदी उलटी असून प्रकरणातील पीडिता मुस्लिम धर्मीय असून आरोपी हिंदू धर्मीय आहेत.

हेही वाचा- जमावाने जाळले ‘खान इलेक्ट्रिकल्स’ दुकान, ‘ऑप इंडिया’चा मुस्लिमांकडून हिंदू मालमत्तांच्या जाळपोळीचा दावा!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा