देशातील बेरोजगारीचा प्रश्न भीषण होत चाललेला असतानाच कोरोना महामारीमुळे ही समस्या अजून विक्राळ होताना बघायला मिळतेय. अशातच व्हाट्सअपवर ‘१२वी पास युवकांना परिक्षेविना थेट भरती’ची संधी (direct recruitment in indian army) दिली जात असल्याचा दावा करणारी पीडीएफ व्हायरल होतेय.
व्हायरल मेसेज:
जर कोणीही आपल्या नात्यातला/ओळखीतला मुलगा 12th मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री व मैथेमेटिक्स विषय घेऊन 70% च्या वर पास झाला असेल तर त्याच्यासाठी भारतीय सेने मध्ये कसलीही परीक्षा न देता डायरेक्ट इंटरव्यू देऊन अधिकारी बनणे हा मुअतिशय उत्तम पर्याय व संधी आहे, ही सोन्यासारखी संधी आहे जी गमावू नये.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यासोबतची पीडीएफ फाईल ओपन करून पाहिली आणि त्यातील माहिती काळजीपूर्वक वाचली.
- ती जाहिरात जुनी:
जाहिरातीतील माहिती आणि व्हायरल मेसेजमधील मजकूर जुळणारा असला तरीही पीडीएफ मध्येच सर्वात शेवटी अर्ज करण्याच्या तारखेविषयी ठळक सूचना दिली आहे. सूचनेनुसार अर्ज करण्याचा कालावधी १० ऑगस्ट २०२० ते ०९ सप्टेंबर २०२० दरम्यान होता.
- त्यानंतरही संधी उपलब्ध होती:
आम्ही www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर सदर जाहिराती संदर्भात पडताळणी करत असताना याच फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयांसह किमान 70% गुणांनी १२वी पास झालेल्या युवकांसाठी संधी उपलब्ध होती असे आढळले. ‘10+2 Technical Entry Sceme‘ अंतर्गत ही भरती प्रक्रिया असते. यासाठी अर्ज करण्याची मुदत 1 फेब्रुवारी 2021 ते 2 मार्च 2021 च्या दरम्यान होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की व्हायरल दाव्यातील जाहिरात बनावट नव्हती, परंतु सध्या मात्र मुदत संपल्यानंतरही ती व्हॉट्सअपवर फिरत आहे.
ठराविक काळानंतर अशा प्रकारच्या भरती प्रक्रियेच्या जाहिराती येत असतात. परंतु त्याची खात्री अधिकृत वेबसाईटवर जाऊनच करायला हवी. नोकरी देण्याचे आमिष दाखवून कुणी आर्थिक फसवणूक करू नये यासाठी सतर्क रहायला हवं.
हे ही वाचा: रेल्वे खात्यात वेल्डर पासून कनिष्ठ सहाय्यक पदांच्या ५२८५ जागांवर भरतीची जाहिरात फेक!
[…] […]