Press "Enter" to skip to content

विलासराव देशमुखांच्या बालपणीचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून व्हायरल!

दोन दिवसांपूर्वीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. त्यापूर्वी पासूनच सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीचा (dr babasaheb ambedkar childhood photos) हा फोटो असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

विनोद इंगळे यांनी बहुजन समाज पार्टी या फेसबुक ग्रुपवर अपलोड केलेला फोटो ३६८ युजर्सकडून शेअर करण्यात आलाय. फोटोवर लिहिण्यात आलंय,

“क्रांतिकारी जय भीम साथियों, जय भीम का नारा दुनिया में सबसे प्यारा, दुनिया में सबसे सुंदर। बाबा साहेब डॉ भीमराव अंबेडकर। मेरे बाबा साहेब का बचपन का फोटो।”

फेसबुकवर इतरही अनेकांकडून हाच फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. यासंदर्भातील सर्व पोस्ट्स आपण येथे बघू शकता.

पडताळणी:

व्हायरल फोटो दिसणारी व्यक्ती खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत का हे जाणून घेण्यासाठी आम्ही व्हायरल फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं २७ एप्रिल २०१८ रोजीचं ट्विट मिळालं. त्यावेळी राज्यात भाजप-सेना युतीचं सरकार होतं आणि वर्षा गायकवाड विरोधी पक्षात होत्या.

ट्विटमध्ये वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकराज्य’ मासिकाची इंग्रजी आवृत्ती असणाऱ्या ‘महाराष्ट्र अहेड’च्या एप्रिल 2018 च्या अंकात महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीचा (dr babasaheb ambedkar childhood photos) म्हणून वापरण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.

अर्काइव्ह पोस्ट

हाच धागा पकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला ‘दै. दिव्य मराठी’च्या वेबसाईटवर ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांऐवजी विलासरावांचे छायाचित्र, \’महाराष्ट्र अहेड\’चे वितरण थांबविले’ या हेडलाईनखाली प्रकाशित बातमी मिळाली.

Divya Marathi news about 'Maharashtra Ahead' regarding Dr Ambedkar's childhood photo
Source: Divya Marathi

बातमीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त २०१८ साली राज्य शासनाकडून ‘लोकराज्य’ मासिकाचा जयंती विशेषांक प्रकाशित करण्यात आला होता. त्या अंकाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (dr babasaheb ambedkar childhood photos) म्हणून विलासराव देशमुख यांचा फोटो वापरण्यात आला होता.

झालेली आल्याची चूक लक्षात आल्यानंतर आल्यानंतर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून अंकाचे वितरण तातडीने थांबविण्यात आले होते. चुकीसाठी जबाबदार असलेल्या संस्थेवर कारवाई केली जाईल, असा खुलासा देखील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात आला होता.

‘लोकराज्य’ या मासिकाची इंग्रजी आवृत्ती असणाऱ्या ‘महाराष्ट्र अहेड’ची निर्मिती खासगी संस्थकडून केली जाते. संस्थेने एप्रिल 2018 चा अंक छपाईला जाण्यापूर्वी माहिती जनसंपर्क महासंचालनालयाला सादर केलेल्या मसुद्यामध्ये अंकात आंबेडकरांचे म्हणून वापरण्यात आलेला फोटो अधिकृत संकेतस्थळावरुन घेण्यात आल्याचे सांगितले होते. अंक प्रकाशित झाल्यानंतर मात्र संबंधित फोटो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा नसून दिवंगत विलासराव देशमुख यांचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित संस्थेने चूक झाल्याचे मान्य केल्याचा खुलासा देखील माहिती जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात आला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणीचा म्हणून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला फोटो महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बालपणीचा आहे.

महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र अहेड’ या मासिकाच्या २०१८ सालच्या आंबेडकर जयंती विशेषांकात हा फोटो सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून वापरण्यात आला होता. अंकात चुकीचा फोटो वापरण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर अंकाचे वितरण थांबविण्यात आले होते.

हे ही वाचा- सावित्रीबाई फुले यांच्या भिडेवाड्यातील मुलींच्या शाळेचा हा दुर्मिळ फोटो नाही, मग कुठला?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा