Press "Enter" to skip to content

उत्तर प्रदेशातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा म्हणून काँग्रेसकडून शेअर केला जातोय राजस्थानमधील व्हिडीओ!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये पाण्याने डबडबलेल्या रस्त्यावरून एक ऑटोरिक्षा जाताना दिसतेय. या रिक्षामध्ये काही पोलीस बसलेले आहेत. आधीच पाण्याने डबडबलेला रस्ता इतका खराब आहे की व्हिडिओमध्ये चालती रिक्षा उलटलेली बघायला मिळतेय. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील रस्त्यांची दुरावस्था दाखवणारा असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

उत्तर प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या अधिकृत अकाऊंटवरून “आज तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींच्या ‘विकासात’ उत्तर प्रदेश पोलीस बुडणार होते. थोडक्यात वाचले” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला दै. भास्करच्या वेबसाईटवर या व्हिडीओ संदर्भातील बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार खराब रस्त्यामुळे रिक्षा पलटण्याची घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील बांदाकुई येथील आहे.

भास्करच्या बातमीनुसार पोलिस स्टेशनचे गार्ड ऑटोने कोलाना कारागृहाच्या दिशेने जात होते. त्यावेळी आग्रा गेटजवळ 3 फुटांपेक्षा जास्त पाणी साचले होते. अशा स्थितीत ऑटो एका खड्ड्यात अडकला आणि उलटला. या दुर्घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

नवभारत टाइम्सच्या युट्यूब चॅनेलवर देखील हा व्हिडीओ बघायला मिळाला. राजस्थानच्या दौसा येथील रस्त्यांची दुरावस्था दाखवणारा व्हिडीओ घटनास्थळी उपस्थित असलेल्यापैकीच कुणीतरी रेकॉर्ड केला असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांकडून देखील व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील नसून राजस्थानातील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील रस्त्यांची दुर्दशा दाखवणारा म्हणून व्हायरल व्हिडीओ वस्तुतः राजस्थानमधील आहे.

हेही वाचा- देशात फक्त हिंदू मंदिरांनाच कर भरावा लागतो का? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा