Press "Enter" to skip to content

योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीआधी चक्क पैसे वाटले? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

उत्तर प्रदेश निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मतदारांना पैसे वाटल्याचे दावे व्हायरल होतायेत. राजरोसपणे पैसे वाटप चालू असल्याचा एक व्हिडीओ या दाव्यांसह जोरदार फॉरवर्ड केला जातोय.

Advertisement

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक चंद्रसेन वेदक, तानाजी कांबळे, पुरुषोत्तम शर्मा आणि अजय कदम यांनी फेसबुक, ट्विटरप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ इनव्हीड टूलच्या आधाराने रिव्हर्स सर्च केला असता यांडेक्स या सर्च इंजिनवर व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेमसोबत तंतोतंत जुळणाऱ्या एका व्हिडीओची लिंक समोर आली. “Yogi Adityanath_0416.AVI.” असे या व्हिडीओ फाईलचे नाव होते.

यानुसार सर्च केले असता इंडिया टुडे, द क्विंट अशा काही राष्ट्रीय माध्यमांनीही या व्हिडीओची पडताळणी केल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडीओचा मूळ व्हिडीओ २१ एप्रिल २०१२ रोजी युट्युबवर अपलोड करण्यात आला होता. विनय कुमार गौतम यांनी हा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर व्हिडीओविषयी स्पष्टीकरण दिले.

“२०१२ सालच्या एप्रिल महिन्यात गोरखपूरची काही शेती जळून गेली. त्यावेळी गोरखपूरचे खासदार या नात्याने योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आणि शेतजमिनीच्या आकारमानानुसार १००० ते २००० रुपयांचे वाटप केले.”

– विनय कुमार गौतम

हा व्हिडीओ २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांदरम्यानही अशाच काही दाव्यांसह व्हायरल होत होता. त्यावेळी ‘बूम‘ने याची पडताळणी केली होती. त्यातही हीच माहिती समोर आली होती.

५ एप्रिल २०१९ रोजी अपलोड झालेला व्हिडीओ:

Source: Youtube

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे पैसे वाटप होत असल्याचे दर्शविणारा व्हिडीओ आताचा नसून २०१२ सालचा आहे. विविध माध्यमांनुसार योगी पिडीत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. ‘चेकपोस्ट मराठी’या बाबीची स्वतंत्ररित्या पडताळणी करू शकले नसले तरीही हे स्पष्ट आहे की या व्हिडीओचा आताच्या निवडणुकांशी काहीएक संबंध नाही कारण सदर व्हिडीओ २०१९ सालीही व्हायरल होत होता.

हेही वाचा: योगी सरकारने पसरवल्या ‘हार्वर्ड विद्यापीठा’ने उत्तम कामगिरीची दखल घेतल्याच्या चुकीच्या बातम्या!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा