Press "Enter" to skip to content

अंदमानात सजा भोगणाऱ्या सावरकरांचा दुर्लभ व्हिडिओ म्हणत व्हायरल होतेय डॉक्युमेंटरीची क्लिप!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओच्या व्हॉइस ओवरवरून व्हिडीओ सावरकरांविषयी असल्याचे लक्षात येते. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की एका ब्रिटिश पत्रकाराने अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या वीर सावरकरांचा (Veer Savarkar) दुर्लभ व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Advertisement

अर्काइव्

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक रमेश म्हात्रे यांनी सदर व्हिडीओ व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यात देवनागरी भाषेमध्ये ‘भूगोल’ आणि खालच्या बाजूला फिल्म्स डिव्हिजनचा (films division) लोकप्रिय लोगो दिसून येतोय. फिल्म्स डिव्हिजनच्या लोगोमुळे सदर व्हिडीओ ही फिल्म्स डिव्हिजनची निर्मिती असल्याची शक्यता निर्माण होते.

या माहितीच्या आधारे युट्युबवर शोध घेतला असता आम्हाला 14 ऑगस्ट 2014 रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (Ministry of Information & Broadcasting) यूट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेला 40 मिनिटे 58 सेकंदांची संपूर्ण डॉक्युमेंटरी मिळाली.

‘Life of Shri Vinayak Damodar Savarkar’ नावाच्या या डॉक्युमेंटरीच्या सुरुवातीलाच ‘फिल्म डिविजन की भेंट’ असे वाचायला मिळतेय. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ याच डॉक्युमेंटरीमधील आहे.

फिल्म्स डिव्हिजनच्या वेबसाईटवर देखील साधारणतः 44 मिनिटांची ही डॉक्युमेंटरी विक्रीसाठी उपलब्ध आहे. वेबसाईटवरील माहितीनुसार 1983 सालची ही डॉक्युमेंटरी प्रेम वैद्य (Prem Vaidya)  यांनी दिग्दर्शित केली असून फिल्म्स डिव्हिजनने या डॉक्युमेंटरीची निर्मिती केली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील सावरकरांचा ब्रिटिश पत्रकाराने पोस्ट केलेला दुर्लभ व्हिडीओ म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडीओ वस्तुतः फिल्मस डिव्हिजनने त्यांच्यावर बनवलेल्या डॉक्युमेंटरीमधील आहे.

फिल्मस डिव्हिजनकडून 1983 साली सावरकरांच्या आयुष्यावर एका डॉक्युमेंटरीची निर्मिती करण्यात आली होती. प्रेम वैद्य यांनी ही डॉक्युमेंटरी दिग्दर्शित केली होती. व्हायरल व्हिडीओ याच डॉक्युमेंटरीमधील आहे.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या आधारे इंदिरा गांधींचा फोटो ठेवल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा