Press "Enter" to skip to content

राकेश टिकैत ‘अल्ला हू अकबर’चा घोष करत असतानाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल!

शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये राकेश टिकैत ‘अल्ला हू अकबर’चा (allahu akbar) नारा लगावताना दिसताहेत. दावा केला जातोय राकेश टिकैत आता तालिबान्यांचीच भाषा बोलताहेत.

दिल्ली भाजपचे प्रवक्ते अजय सेहरावात यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राकेश टिकैत यांचा हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यात ते म्हणतात,

Advertisement

“अब जाटों को फक्र नही फिक्र होनी चहिये”

अर्काइव्ह

सोशल मीडियावर फेक न्यूज पसरविण्यासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या शेफाली वैद्य यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केलाय. वैद्य यांचं ट्विट १८०० पेक्षा अधिक वेळा रिट्विट केलं गेलंय.

अर्काइव्ह

पडताळणी:

राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर येथे भरलेल्या किसान महापंचायतीच्या (Muzaffarnagar Mahapanchayat) व्यासपीठावरून शेतकऱ्यांना उद्देश्यून जे भाषण केले त्या भाषणातला हा व्हिडीओ आहे.

राकेश टिकैत यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून मुझफ्फरनगर किसान महापंचायतीतील संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये 11 मिनिट 24 सेकंदांपासून पुढे राकेश टिकैत म्हणताहेत,

“इस तरह की सरकारें अगर देश में होंगी तो ये दंगे करवाने का काम करेंगी. पहले भी नारे लगते थे जब टिकैत साहब थे अल्लाह हू अकबर ..अल्लाह हू अकबर के नारे लगते थे…हर हर महादेव और अल्लाह हू अकबर के नारे इसी धरती से लगते थे.”

राकेश टिकैत पुढे म्हणतात,

“ये नारे हमेशा लगते रहेंगे ..दंगा यहां नहीं होगा ..ये तोड़ने का काम करेंगे हम जोड़ने का काम करेंगे.”

अनेक ट्विटर युजर्सनी राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिलेल्या ‘अल्लाह हू अकबर’च्या (allahu akbar) संदर्भाने फिरवल्या जाणाऱ्या व्हिडिओच्या प्रत्युत्तरात संपूर्ण व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपण हा व्हिडीओ देखील बघू शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर राकेश टिकैत ‘अल्ला हू अकबर’चा घोष करत असतानाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. मूळ व्हिडिओशी काटछाट करण्यात आली असून मूळ व्हिडिओमध्ये राकेश टिकैत ‘अल्ला हू अकबर’ नंतर ‘हर हर महादेव’चा घोष देखील करताहेत आणि धार्मिक एकोप्याचा संदेश देताहेत.

हेही वाचा- मध्य प्रदेश सरकारने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी झालेली ‘गफूर वस्ती’ उध्वस्त केल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा