Press "Enter" to skip to content

लंडनमध्ये मुस्लीम वचक एवढा वाढला की कट्टरपंथीयाचे थेट रस्त्यावर नमाज पठण? वाचा सत्य!

‘आता आता ७५ वर्षांपूर्वीपर्यंत अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीशांच्या लंडन (london) शहरात कट्टरपंथीय मुस्लीम भर दिवसा रस्त्यात नमाज (namaz) अदा करतायेत. सगळं धुळीस मिळालं’ अशा प्रकारच्या दाव्यांसह भर रहदारीच्या रस्त्यात मुस्लीम व्यक्ती नमाज पढत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Advertisement

‘लंदन इस्लाम की चपेट में आज ब्रिटेन में 89 मुस्लिम महापोर ओर लगभग 40/50 मुस्लिम सांसद बन गए हैं इसलिए ये जो चाहते है करवा लेते हैं । एक अकेला मुल्ला लंदन की भीड़ भरी सड़क पर नमाज़ पढ़ रहा है । दूसरे मायने में इस्लाम की ताकत दिखा रहा है । यह आने वाले हिन्दुस्तान का भविष्य है’ असे हिंदीतील कॅप्शन आणि ‘Madness in London. The Brits who were ruling half of the world just until 75 years ago, have lost it all to radical islamic activists already.’ असे इंग्रजीतील कॅप्शन त्या व्हिडीओसोबत व्हायरल होताना दिसतेय.

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन आणि बळीराम पाटील यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले त्यामध्ये ०.०३ सेकंदालाच पिवळ्या रंगाची एक टॅक्सी दिसत आहे. त्यावर ‘TET 57‘ असे लिहिले आहे. गुगल सर्च केल्यानंतर असे लक्षात आले की ही कॅब सर्व्हिस तुर्की देशातील इस्तानबुल शहरातील आहे.

याच माहितीच्या आधारे पुन्हा गुगलसर्च करून पाहिले असता ‘डेलीमोशन‘वर ‘T24Haber’ने अपलोड केलेला व्हिडीओ आम्हाला मिळाला. व्हिडीओसोबत त्याविषयी माहिती देखील दिली आहे. इस्तानबुलच्या ‘E-5’ महामार्गावरील ही घटना आहे. नमाज (namaz) पढणाऱ्या व्यक्तीस रस्त्याच्या बाजूचे लोक खडसावत आहेत.

याच व्हिडीओच्या १७ व्या सेकंदाला रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या इमारतींवरील नावे अस्पष्ट पण वाचता येतील असे दिसतायेत. ‘मेट्रोपोर्ट’ , ‘मेडिकल पार्क’ अशी काही ठळक नावे त्यावर आहेत. इस्तानबुलमध्ये अशी नावे असणाऱ्या इमारती आहेत का? हे सर्च करत असताना ‘द क्विंट’ने ‘गुगल अर्थ’च्या मदतीने मिळवलेला, तंतोतंत जुळणारा इमारतींचा फोटो सापडला.

<div class="paragraphs"><p>Left: Viral video. Right: Istanbul location.</p></div>
Source: The Quint

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की भर रस्त्यात नमाज (namaz) पठण करणाऱ्या व्यक्तीचा व्हायरल व्हिडीओ लंडन (london) मधील नसून मुस्लीम राष्ट्र असणाऱ्या तुर्कीच्या इस्तानबुल मधील आहे. त्या व्यक्तीच्या या कृत्यास तेथील स्थानिक विरोध करत असल्याचेही समजते. म्हणजेच व्हायरल दावे ‘फेक’ आहेत.

हेही वाचा: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पढली मशिदीत नमाज? हा कॉंग्रेसचा खरा चेहरा? वाचा सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा