Press "Enter" to skip to content

माळेगाव घाटातील दरड कोसळल्याचा म्हणून ‘झी २४ तास’ने चालवला आसाममधील व्हिडीओ!

राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना झाल्याच्या बातम्या देखील बघायला मिळताहेत.

‘झी २४ तास’ने साधारणतः आठवडाभरापूर्वी ‘मान्सूनची खबरबात’ या कार्यक्रमात नाशिक-सुरत महामार्गावरील माळेगाव घाटात दरड कोसळल्याची बातमी दिली होती. या बातमीसोबत दरड कोसळतानाचा व्हिडीओ देखील चालविण्यात आला होता. दरड कोसळतानाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाल्याचे बातमीमध्ये सांगण्यात आले होते.

Advertisement

अर्काइव्ह

दरम्यान, ‘झी २४ तास’च्या बुलेटिनमध्ये माळेगाव घाटातील दरड कोसळल्याचा म्हणून चालविण्यात आलेला हा व्हिडीओ आसाममधील असल्याची माहिती समोर आली आहे.

आसाममधील आम आदमी पक्षाच्या नेत्या मासुमा बेगम यांनी २१ जून २०२२ रोजी हा व्हिडीओ ट्विट केला होता. व्हिडीओ ट्विट करताना त्यांनी ईशान्य भारतातील लोकांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.

अंशू राज या ट्विटर युजरकडून देखील २४ जून रोजी हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता.

ईस्टमोजो आसामच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरून देखील २१ जून २०२२ रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार कचहार सिलचर रोडवरील भीषण भूस्खलनाच्या घटनेचा हा व्हिडीओ आहे.

हेही वाचा- स्टेट बँकेने अदानींचे १२ हजार कोटींचे कर्ज माफ केल्याची बातमी फेक! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा