Press "Enter" to skip to content

बद्रीनाथ मंदिराची जागा बद्रुद्दीन दर्ग्याची असल्याचा दावा करणाऱ्या मौलवीची मशीद जेसीबी चालवून पाडली?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका मौलवीचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एका मौलवीने सध्याचे बद्रीनाथ मंदिर (Badrinath Temple) ज्या ठिकाणी आहे, त्याठिकाणी पूर्वी बद्रुद्दीन शाह दर्गा (badruddin shah dargah) असल्याचा दावा केला होता.

Advertisement

आता सोशल मीडियावर अजून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये जेसीबीच्या मदतीने एक मोठी इमारत आणि आजूबाजूची घरे पाडली जात असताना बघायला मिळतंय. सोशल मीडियावर दावा केला जातोय की योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बद्रीनाथ मंदिराच्या जागी बद्रुद्दीन दर्गा असल्याचा दावा करणाऱ्या मौलवीला अद्दल घडविण्यासाठी त्या मौलवीची मशीद जेसीबीने जमीनदोस्त केली आहे.

“उन्नाव वाला बकरा जो बद्रीनाथ को बदरुदीन की जगह बता रहा था उस मस्जिद और आसपास के घर उड़ा दिए योगी बाबा ने..!! FIR दर्ज की और कागज दिखाने को बोला गया अवैध बनी थी मस्जिद और घर..!! योगी जी आह योगी जी!!” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला जात असून योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं जातंय.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ अशाच कॉपीपेस्ट दाव्यांसह व्हायरल होतोय. 

पडताळणी:

आम्ही रिव्हर्स सर्चच्या माध्यमातून व्हिडिओचा शोध घेतला असता व्हायरल व्हिडीओ दि. २७ जुलै २०२१ रोजी ‘तेजस खबर’ या युट्यूब चॅनेलवरून हा अपलोड केला गेला असल्याचे बघायला मिळाले.

‘तेजस खबर’ वरील बातमीनुसार व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील आहे. उन्नाव प्रशासनाने 8 जेसीबी आणि दोन पोकलेन मशीनच्या मदतीने 8 तास मोहीम राबवून अवैध बांधकाम पाडले. लखनऊ-कानपूर महामार्गावरील पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर हे अवैध बांधकाम करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही किवर्डच्या आधारे शोध घेतला. आम्हाला न्यूज १८ हिंदीच्या वेबसाईटवर प्रकाशित बातमी मिळाली. या बातमीनुसार उन्नाव प्रशासनाने कारवाई दरम्यान जवळपास २० कोटींच्या जमिनीवरील अवैध बांधकाम हटविले.

source: News18 Hindi

बातमीनुसार अतिक्रमण केलेल्यांना यापूर्वी जागा सोडण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती, मात्र कुणीही जागा खाली न केल्याने प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशचे जल शक्ती मंत्री डॉ. महेंद्र सिंग यांनी देखील आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून व्हिडीओ शेअर करत या कारवाईची माहिती दिली होती. 

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट सोशल मीडियावर अतिक्रमण हटविण्यासंदर्भातील कारवाईचा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. या व्हिडिओचा बद्रीनाथ मंदिराची जागा बद्रुद्दीन दर्ग्याची असल्याचा दावा करणाऱ्या मौलवीशी काहीही संबंध नाही.

हेही वाचा- बद्रीनाथ मंदिरात नमाज पढून मुस्लीम समुदायाने ते मंदिर नसून बद्रुद्दिन शाह दर्गा असल्याचा दावा केलाय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा