पाकिस्तानमधील पेशावर मध्ये छोट्या हिंदू, दलित मुलांना विजेचे झटके देऊन जबरदस्तीने इस्लाम मध्ये धर्मांतरीत केले जात असल्याच्या दाव्यांसह एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.
व्हायरल दावा:
पाकिस्तान के पेशावर के हिंदू लोगों और छोटे छोटे हिंदू ,दलित बच्चो को stun gun से बिजली के झटके और थर्ड डिग्री टॉर्चर करते हुए इस्लाम में जबरदस्ती कन्वर्जन कराने का प्रत्यक्ष वीडियो देखिए।
यहां कभी हिंदू, दलित बहुसंख्यक थे, लेकिन नेहरू गांधी के सेक्युलरिज्म की वजह से आज ये हालत है।
अगर आप नहीं संभले तो समझ लीजिए कुछ ही सालों में आपके छोटे छोटे नाती पोते भी ऐसे ही इन मुल्ले मौलवियों के हाथों तड़पाए जा रहे होंगे।। 🤔
हिंदु, दलितओ संभल जाओ और संगठित होकर इन मुल्लों को मुंहतोड़ जवाब देकर इनका बहिष्कार करो।
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दिनेश सूर्यवंशी यांनी सदर दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. अशाच प्रकारचे दावे ट्विटर- फेसबुकवरही व्हायरल होताना दिसत आहेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने विविध कीवर्ड्सच्या आधारे सर्च केले असता अशाच प्रकारचे दावे रेडीटवरही पोस्ट करण्यात आल्याचे आढळले. यावरील कॉमेंट्समध्ये व्हिडीओतील भाषा पश्तो असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात दिसणारे तरुण-तरुणी मुस्लिमच आहेत. व्हिडीओ हिंदूंना ईस्लाममध्ये धर्मांतरित करून घेण्यासाठीचा नसून भूत-पिशाच्च घालवणाऱ्या ह्कीमाचा आहे.
काही कमेंट्समध्ये व्हिडीओतील बाबाचे नाव हाजी मुहम्मद उल्लाह असल्याचे सांगितले आहे. याआधारे सर्च केले असता युट्युबवर त्या बाबाने अपलोड केलेले असे बरेच व्हिडीओ आम्हाला आढळले. या सर्व व्हिडीओजमध्ये कुठेही कुठल्या व्यक्तीचे धर्मांतर केले जात असल्याचे बघायला मिळत नाही. हा बाबा कथितरित्या भूतबाधा उतरवीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की विजेचा शॉक देऊन, जोर जबरदस्ती करून पेशावरमधील लहान मुलां- मुलींना इस्लाममध्ये धर्मांतरीत केले जात असल्याचे दावे फेक आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये भूत पिशाच्च पळवून लावणारा बाबा आहे.
हेही वाचा: कचरा फेकण्यास नकार दिला म्हणून मुस्लिम युवकाचा हिंदू महिलांवर प्राणघातक हल्ला? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]