Press "Enter" to skip to content

रशियन सैन्याने सामान्य नागरिकांवर हल्ले केल्याचे दर्शवण्यासाठी जिवंत लोकांना चादरी पांघरल्याचे दावे फेक! वाचा सत्य!

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणात रशियाद्वारे सामान्य निष्पाप नागरिक (casualties ukraine) सुद्धा मारले जातायेत. हे दर्शविणाऱ्या वृत्तवाहिनीवरील बातमीत एक मृतदेह स्वतःची चादर व्यवस्थित करतानाची दृश्ये व्हायरल होत आहेत. एकूणच रशियावर होत असलेल्या आरोपावर शंका उपस्थित केली जातेय.

‘रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात निष्पाप नागरिकांचे कसे नाहक मृत्यू झाले, याची बातमी देत असताना, एका मुडद्याने आपली चादर नीट केली तो अदभूत क्षण..’

Advertisement
या अशा कॅप्शनसह २१ सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला जातोय.

ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही ‘Forwarded many times’ या टॅगसह हेच दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अजीव पाटील, चंद्रकांत कापुरे, सागर पाटील, सतीश माळवदे, डॉ. राहुल पाटील, निशिकांत गोळे, गोविंद भुजबळ आणि सुभाष विसपुते यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स गुगल रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता ४ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘Oe24‘ या न्यूज चॅनलच्या वेबसाईटवर अपलोड झालेला व्हिडीओ सापडला. मुळची जर्मन भाषेतील ही वेबसाईट गुगल क्रोमच्या मदतीने इंग्रजीमध्ये भाषांतरित केली असता व्हिडीओच्या खाली ‘Vienna: Demo against climate policy’ असे लिहिल्याचे दिसले.

याच माहितीच्या आधारे शोधाशोध केली असता ५ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘Fridays for future Wien’ या ट्विटर हँडलवरून झालेले ट्विट आम्हाला सापडले. जर्मन भाषेतील हे ट्विट ट्रान्सलेट कर्ण वाचले असता असे समजले की ऑस्ट्रिया देशाच्या फेडरल गव्हर्नमेंटकडून ४०० दिवसांत एकही पर्यावरण रक्षणार्थ कायदा संमत झाला नाही. ऑस्ट्रियाने जर ग्रीन हाउस गॅसेसवर नियंत्रण नाही मिळविले तर देशात दिवसाला ४९ लोक मृत्युमुखी पडतील. हेच दाखविण्यासाठी जे आंदोलन केले गेले त्याचे हे दृश्य आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की बातमीच्या मध्येच अंगावरील चादर ठीक करणारा मृतदेह युक्रेनचा नाही. हाच व्हिडीओ काही दिवसांपूर्वी ‘कोव्हीड १९‘च्या मृतांची खोटी आकडेवारी दाखविण्यासाठी रचलेले नाटक म्हणून व्हायरल होत होता. मुळात तो मृतदेह नसून ऑस्ट्रिया देशात सरकारविरुद्ध केलेल्या एका आंदोलनातील जिवंत आंदोलक आहे.

हेही वाचा: ‘युक्रेन वादात हस्तक्षेप केल्यास होतील गंभीर परिणाम’, पुतीन यांची भारताला धमकी? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा