Press "Enter" to skip to content

कॉंग्रेस नेत्यांनी स्वतःचेच सरकार असलेल्या राज्यातला व्हिडीओ खपवला केजरीवालांच्या नावे!

फेक न्युज हे बूमरँग होऊन अंगावर येण्याचं उदाहरण म्हणजे ही बातमी. दिल्लीचा व्हिडीओ म्हणत कॉंग्रेस नेत्यांनी पाणी भरत असलेल्या बसचा (bus entering in water) व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला पण झालं भलतंच…

Advertisement

रस्त्यावर साचलेलं पाणी प्रवाश्यांनी भरलेल्या बसमध्ये घुसत आहे, जणू बस नदीमधून चालली आहे.

व्हिडीओ शेअर करत दिल्ली कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अभिषेक दत्त यांनी लिहिलेय केजरीवाल जी कल सुबह किस बात का प्रचार फुल पेज ऐड अखबारों के माध्यम से देंगे ? बारिश में जल भराव के समय चाय के साथ पकोड़े कैसे बनाए ?” आणि हे व्हॉट्सऍपवरून आल्याचं कंसात सूचित केलंय.

कॉंग्रेसमधून आपमध्ये गेलेल्या आणि पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेल्या अल्का लांबा यांनीही अभिषेक दत्त यांचं हे ट्विट रीट्विट केलं होतं.

अर्काइव्ह लिंक

हाच व्हिडीओ ‘केजरीवाल दिल्ली वालों को वेनिस का tour dtc बसों में करवाते हुए’ या कॅप्शनसह फेसबुक ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर झालाय.

fb posts showing flooded bus to tell delhi scenario
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सदर व्हिडीओची फ्रेम गुगल रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिली. त्यानंतर काही कीवर्ड्स वापरूनही शोधाशोध केली. यात आम्हाला ११ ऑगस्ट २०२०ची ‘पत्रिका’ मध्ये प्रसिद्ध बातमी सापडली.

बातमीनुसार ही घटना राजस्थानची राजधानी जयपूर शहरातील असल्याचे समजले.

Source:Patrika

बातमीमध्ये असलेल्या ३.४६ मिनिट एवढ्या लांबीच्या व्हिडीओतील साधारण ३० सेंकदाचा भाग व्हायरल झालेला आहे. पुन्हा एकदा खातरजमा म्हणून आम्ही मूळ व्हिडीओ पुन्हा पाहिला. त्यात एका फ्रेम मध्ये ‘नसियाँ भट्टारकजी’ असा बोर्ड आम्हाला ठळकपणे दिसला.

nasiya bhattarkaji board

‘नसियाँ भट्टारकजी’ असं गुगल सर्च करून पाहिलं तेव्हा जयपूर येथील जैन मंदिर समोर आलं.

nasiya bhattarkaji jain temple address

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये हे सिद्ध झालं की बसमध्ये पाणी घुसत असलेला (bus entering in water) व्हायरल व्हिडीओ दिल्लीचा नसून जयपूर मधील आहे.

जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे, जेथे सध्या अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षाचं सरकार सत्तेत आहे.

हेही वाचा: अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधण्यासाठी भाजप नेत्याने दिल्लीचे म्हणत वापरले पंजाबचे फोटो!

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा