Press "Enter" to skip to content

लंडनच्या सेंट जेम्स स्कूलमध्ये गायले जातात संस्कृत श्लोक? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

लंडन येथील सेंट जेम्स स्कूलमध्ये (St James School) संस्कृत श्लोक गायले जातायेत आणि आपण इथे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार आणि बाबा ब्लॅक शिप शिकवत आहोत. आपल्याला याची लाज वाटायला हवी. अशा प्रकारच्या दाव्यांसह सोशल मीडियात एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. यामध्ये ब्रिटीश शालेय विद्यार्थी चक्क संस्कृत श्लोक गाताना दिसतायेत.

Advertisement

‘सेंट जेम्स स्कूल / लंदन में हो रहे इस कार्यक्रम को देखने के बाद हमलोगों को शर्म आनी चाहिए कि हम अपने बच्चों को ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार और बाबा ब्लैक शीप का पाठ पढ़ाते हैं.!‘ अशा कॅप्शनसह तो व्हिडिओ व्हायरल केला जातोय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन आणि उमेश परब यांनी ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवर देखील हे दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण करून काही बाबींची नोंद केली आणि त्यानुसार विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च करून पाहिले त्यात समोर आलेली माहिती पुढीलप्रमाणे:

ते ‘सेंट जेम्स स्कूल’ नाही:

व्हायरल व्हिडिओसोबत केल्या जात असलेल्या दाव्याप्रमाणे व्हिडीओमध्ये दिसत असलेला कार्यक्रम सेंट जेम्स स्कूल (St James School) मध्ये होत नाहीये. ती इमारत ‘बंकिंगहम पॅलेस’ आहे. लंडनच्या राज घराण्याचे निवासस्थान आणि राजकारभाराचे मुख्यालय म्हणून या इमारतीस ओळखले जाते. व्हिडीओमध्ये दिसणारी इमारत आणि खालील चित्रातील इमारत तंतोतंत जुळणारी आहे.

Buckingham Palace
Source: commonslibrary.parliament.uk

तो शाळेचा परिपाठ नव्हे, ‘भारता’करिता आयोजित कार्यक्रम होता

२०१० सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांचे यजमानपद इंग्लंड कडून भारताला देण्यात आले होते. याचा औपचारिक प्रतीकात्मक कार्यक्रम १९ ऑक्टोबर २००९ रोजी झाला. यावेळी इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांना मानाचा बॅटन सुपूर्द केला. या कार्यक्रमाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कलाप्रकार दर्शविण्यात आले होते. शास्त्रीय नृत्य, गायन, संस्कृत श्लोक इत्यादींचे सादरीकरण या ठिकाणी झाले. संस्कृत श्लोकाचे सादरीकरण सेंट जेम्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले होते.

सेंट जेम्स स्कूल मध्ये संस्कृत शिकविले जाते?

व्हायरल व्हिडीओ शाळेतील वर्गाचा नाही. भारताच्या राष्ट्रपती महोदयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ असला तरीही पडताळणीदरम्यान आम्हाला एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी त्या कार्यक्रमात सादरीकरण केले होते ते ‘सेंट जेम्स स्कूल’चेच विद्यार्थी आहेत. शाळेच्या वेबसाईटनुसार शाळेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९७५ सालापासूनच शाळेच्या अभ्यासक्रमात संस्कृत भाषेचा समावेश आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारे विद्यार्थी सेंट जेम्स स्कूलचे आहेत परंतु हा व्हिडीओ सेंट जेम्स स्कूलचा नसून बंकिंगहम पॅलेसचा आहे. २०१० सालच्या कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धांचे यजमानपद भारताकडे सोपविण्यासाठीचा तो कार्यक्रम होता.

हेही वाचा- केरळ सरकारने पुजारी पद दिलेल्या मुस्लिम पुजाऱ्यांनी हिंदू मंदिरात गायले अल्लाह इलाही गाणे? वाचा सत्य!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा