Press "Enter" to skip to content

मशिदीवर भगवा फडकवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ राजस्थानमधील नाही! मग कुठला? वाचा सत्य!

राजस्थानमधील करौली (Karauli) शहरात हिंदुत्ववादी संघटनांच्या बाईक रॅलीवर झालेल्या दगडफेकीनंतर मोठा गोंधळ उडाला . यामुळे निर्माण झालेल्या दंगलीत हिंसाचार उसळला. या हिंसाचारात 35 हून अधिक दुकानं जाळण्यात आली तर अर्धा डझनहून अधिक दुचाकींची तोडफोड करण्यात आली. हिंसाचाराची परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी पुढाकार घेत कर्फ्यू लागू केला. हा कर्फ्यू 7 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.

Advertisement

आता सोशल मीडियावर करौली हिंसाचाराच्या संदर्भाने अनेक व्हिडीओज व्हायरल होताहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मशिदीवर चढून भगवा ध्वज फडकवत असताना बघायला मिळतेय. सोबतच ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी देखील ऐकायला येतेय. व्हिडिओ शेअर करताना दावा केला जातोय की हा व्हिडीओ करौलीमधील आहे. करौलीमध्ये ज्या मशिदीमधून दगडफेक झाली, त्याच मशिदीवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भगवा फडकावला असल्याचे सांगितले जातेय.

अर्काइव्ह

पत्रकार राणा अय्युब यांनी देखील आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून अशाच प्रकारच्या दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Rana Ayyub shared false claim on instagram
Source: Instagram

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओ कुठला आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला करौली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेले एक ट्विट बघायला मिळाले. या ट्विटमध्ये करौलीचे जिल्हाधिकारी राजेंद्र सिंह शेखावत यांनी सदर घटना करौलीमधील नसल्याचे सांगितले आहे. शिवाय चुकीची माहिती करणाऱ्यांवर कारवाई कारवाई केली जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे याचा शोध घेतला असता ट्विटरवरच हाच व्हिडीओ बघायला मिळाला. ट्विटच्या कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील गहमर येथील असल्याची माहिती देण्यात आली आहे. माजी आमदार सुनीता सिंह यांनी शेकडो समर्थकांसह मशिदीत घुसून नमाज पठन करणाऱ्यांना मारहाण केल्याचे देखील या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीची खात्री पटविण्याकरिता किवर्डसच्या आधारे अधिक शोध घेतला असता लल्लनटॉपचा रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार व्हिडीओ गहमर येथीलच आहे. 2 एप्रिल रोजी गावात नवरात्रीनिमित्त (गुढी पाडवा) रॅली काढण्यात आली होती. याच रॅलीदरम्यान काही लोकांनी मशिदीवर झेंडा फडकावला आणि नारेबाजी केली. यादरम्यान कुठल्याही प्रकारचा हिंसाचार झाला नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करून घेतली असल्याची माहिती गाजीपूरचे पोलीस अधीक्षक राम बदन सिंग यांनी दिली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओसोबत केला जाणारा दावा चुकीचा आहे. व्हिडीओ राजस्थानमधील करौली येथील नसून उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील गहमर येथील आहे.

हेही वाचा- मुस्लिम टेलरकडून कपडे शिवायला आलेल्या हिंदू मुलीशी गैरवर्तन? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा