अवघ्या ८-१० वर्षांच्या लहान मुलाला अर्धनग्न अवस्थेतील इसम निर्दयीपणे मारहाण करत असल्याची दृश्ये असणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
‘आप के whatsapp पे जितने भी नंबर एवं ग्रुप हैं एक भी छूटने नही चाहिए, ये वीडियो सबको भेजिए ये वलसाड के DPS SCHOOL Rajbag का टीचर शकील अहमद अंसारी है इसको इतना शेयर करो की ये टीचर और स्कूल दोनों बंद हो जाए । वीडियोवायरल होने से काफी फ़र्क पड़ता है ओर कार्यवाही होती है जिसे दया न आये वो अपना मुंह (टाइपिंग) बंद रखे ।’
या अशा कॅप्शनसह तो १.२४ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
हाच व्हिडीओ ‘कैसा कम्युनिटी स्टैंडर्ड है शाहब फेसबुक का कि सच्ची घटना को भी वायरल करने पर 6 दिन के लिए ब्लॉक कर दिया।इस वीडियो में एक हिंदू युवती ने एक मोमिन से निकाह किया था और उसके बच्चो को मोमिन किस तरह से मोमिन बनाने का प्रयास कर रहा है कितनी प्रताड़ना दे रहा है क्या ये ह्यूमन राइट्स और वायलेंस अगेंस्ट चाइल्ड नही है, इसमें कोन सा कम्युनिटी स्टैंडर्ड फॉलो नही हो रहा है, क्या फेसबुक पर भी एक ही शांतिप्रिय समुदाय का जमावड़ा है कृपया फेसबुक टीम संज्ञान ले‘ अशाही कॅप्शन सह व्हायरल होतोय.
सोशल मिडियासह व्हॉट्सऍप वरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’च्या वाचकांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स इन्व्हीडच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता सदर व्हिडीओतील घटना पाकिस्तानची असल्याचे समजले.
‘ARY टीव्ही न्यूज’ने ६ जुलै २०२२ रोजी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार सदर घटना कराची जवळील पाकिस्तान बाजार येथील आहे. व्हिडीओतील इसमाचे नाव इस्माईल असून तो स्वतःच्या ११ वर्षीय मुलाला मारहाण करत आहे. झोप खराब केल्याच्या कारणावरून त्याने ही अमानुष मारहाण केल्याचे त्याच्या पत्नीने पोलीस रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
हा व्हिडीओ तिनेच शूट केला आहे. अमली पदार्थांच्या नशेत असणारा हा इसम मुलांना आणि त्याच्या पत्नीला अशाच पद्धतीने मारहाण करत असतो असेही त्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे. सदर इसमावर गुन्ह्याविषयी कायदेशीर तक्रारीची नोंद झाली आहे.
पाकिस्तान सिंध प्रांतातील ‘वूमन प्रोटेक्शन सेंटर’ संस्थेच्या फेसबुक पेजने सदर व्हिडीओ शेअर करत त्यातील अमानवी कृत्याचा जाहीर निषेध नोंदविला आहे. तसेच शासकीय यंत्रणांना दखल घेण्याविषयी विंनती केली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की लहान मुलाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या इसमाचा व्हायरल व्हिडीओ भारतातील नसून पाकिस्तानचा आहे. अमली पदार्थांचे सेवन करून नशेतच बायको मुलांना तो सातत्याने मारहाण करत असल्याची कायदेशीर तक्रार त्याच्या पत्नीने नोंदविली आहे. झोपमोड केल्याने तो स्वतःच्याच मुलाला मारत असतानाचा तो व्हिडीओ असून त्याच्याच पत्नीने तो व्हिडीओ शूट केलेला आहे.
हेही वाचा: विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या ‘शकील अहमद अन्सारी’ या शिक्षकाचा तो व्हायरल व्हिडीओ ?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment