Press "Enter" to skip to content

अभिनेत्रीकडे लैंगिक संबंधाची मागणी करणाऱ्यास झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ भाजप नेत्याच्या नावे व्हायरल!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये काही महिला एका पुरुषाला मारहाण करताना दिसताहेत. व्हिडीओ शेअर केला जात असताना दावा केला जातोय की गावागावातील आणि शहरांमधील महिला शोधून शोधून भाजप नेत्यांची धुलाई करताहेत.

Advertisement

“अब तो लगता है…महिलाओ ने नारंगियों को ढूंढ़ ढूंढ़ कर हाथ सफाई सुरु कर दी है…हर जगहे गाँव और शहरों में… सफ़ाई और धुलाई अभियान शुरु.” अशा कॅप्शनसह सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला जातोय.

Source: Facebook

अर्काइव्ह

ट्विटरवर देखील हा व्हिडीओ याच कॉपीपेस्ट दाव्यासह शेअर केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ट्विटरवरच एका युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला असल्याचे आढळून आले.

ट्विटच्या कॅप्शननुसार मारहाण करण्यात येत असलेली व्यक्ती शिवसेना पदाधिकारी असून तो मुलींना चित्रपटात रोल देण्याचे आमीष देऊन शारीरिक संबंधाची ठेवण्याची मागणी करत होता. त्याच्यासह इतर आरोपींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चोप दिला, अशी माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली होती.  

मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी अधिक शोध घेतला असता याविषयीची सविस्तर बातमी मिळाली. बातमीनुसार घटना ठाण्यातील घोडबंदर येथील असून हिंदी चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी (Casting Cauch) करणाऱ्या प्रोड्युसरसह उत्तर प्रदेशच्या चौघांना मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिला.

आठ ते नऊ वेळा लोकेशन बदलणाऱ्या चार आरोपींचा पाठलाग करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पकडले आणि चोप दिल्यानंतर चौघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी या प्रकरणाचे सर्व व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करत घडलेल्या प्रकाराबद्दलची माहिती दिली.

‘बूम लाईव्ह’च्या रिपोर्टनुसार आरोपींचे नाव राहुल तिवारी, कंचन यादव, राकेश यादव आणि बिरालाल यादव असून कासारवडावली पोलिस स्टेशनचे ए. ई. काळदाते यांनी घटनेची पुष्टी केली असून आरोपींचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. 

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ ठाण्यातील घटनेचा आहे. व्हिडिओतील व्यक्ती ‘कास्टिंग काऊच’ प्रकरणातील आरोपी आहे. या आरोपींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला असून आरोपींचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.

हेही वाचा- संतप्त जमावाकडून भाजप खासदार हर्षवर्धन यांना मारहाण करण्यात आलीये?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा