Press "Enter" to skip to content

पुरात हेलिकॉप्टर, विमाने, गाड्या वाहून चालल्याचे दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ चीनचा नाही!

चीनमधील हेनान प्रांतात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होत आहे. ‘ग्लोबल टाईम्स’च्या बातमीनुसार पुरामुळे आतापर्यंत पूरात 12 लाखांहून अधिक लोक बाधित झाले असून 1.60 लाख लोकांना वाचविण्यात आले आहे. अशातच चीनमधील प्रलयंकारी पुरस्थितीचा (flood situation in China) म्हणून एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Advertisement

व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक वाहने, कार, गाड्या आणि ​​हेलिकॉप्टर पाण्यासोबत वाहून जाताना दिसताहेत. चीनमधील पुराची ही सर्वात भयंकर परिस्थिती असल्याचा दावा केला जातोय.

अर्काइव्ह

चीनवर ईश्वरी प्रकोप सुरु असून चीनला आपल्या कुकर्माचे फळ मिळत असल्याचा दावा देखील काही युजर्सकडून केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीसाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला ‘डेली मेल’च्या वेबसाईटवर 30 एप्रिल 2011 रोजी प्रकाशित बातमी मिळाली. या बातमीमध्ये व्हायरल व्हिडिओतील दृश्याचा फोटो वापरण्यात आला आहे.

Daily Mail news about tsunami in Japan check post Marathi fact
Source: Daily Mail

‘डेली मेल’च्या बातमीनुसार हा व्हिडिओ जपानमधील सेंडाई विमानतळाचा आहे. 11 मार्च 2011 रोजी जपानमध्ये आलेल्या त्सुनामीमुळे विमानतळावरील गाड्या, विमाने, मिनी बस वाहून गेल्या होत्या. व्हिडिओत वाहून जाताना दिसणाऱ्या गाड्यांमध्ये कुणीही नव्हतं.

त्सुनामीमुळे जपानमध्ये 14 हजारांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला होता आणि 12 हजारांपेक्षा अधिक लोक बेपत्ता झाले होते.दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने तोंड दिलेलं हे सर्वात मोठं संकट असल्याचं देखील बातमीत सांगण्यात आलंय.

‘द जापान कोस्टगार्ड’ या सरकारी संस्थेमार्फत हा व्हिडीओ जारी करण्यात आला होता. अनेक माध्यमांनी आपल्या रिपोर्टमध्ये हा व्हिडीओ वापरला होता. ‘वाल स्ट्रीट जर्नल’च्या वेबसाईटवर देखील हा व्हिडीओ उपलब्ध आहे. ‘वाल स्ट्रीट जर्नल’ने देखील हा व्हिडीओ जपान कोस्ट गार्डच्या सौजन्याने अपलोड केला आहे.

WSJ tsunami video in Japan check post Marathi fact
Source: WSJ

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर चीनमधील प्रलयंकारी पुराचा (flood situation in China) म्हणून शेअर केला जात असलेला व्हिडीओ 2011 साली जपानमध्ये आलेल्या त्सुनामीच्या वेळचा आहे. व्हायरल व्हिडिओतील दृश्य जपानमधील सेंडाई विमानतळावरचे आहे.

हेही वाचा- पूरग्रस्तांना मदत पोहचवण्याआधीच शिवसेनेने जाहिरात केल्याचे सांगणारा व्हिडीओ जुना! 

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा