Press "Enter" to skip to content

कुऱ्हाडीने निर्दयीपणे खून करणाऱ्या तरुणांच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य काय? वाचा सविस्तर!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडिओमध्ये तीन तरुण एका मुलावर कुऱ्हाडीने वार करत असल्याचं बघायला मिळतंय. या व्हिडिओसोबत जे ग्राफिक आहे त्यावर ‘मोदी तेरे राज में कानून का कोई नाम नहीं है’ असं लिहिलेलं बघायला मिळतंय.

Advertisement

‘इस व्हिडीओको इतना भेजो की कल तक नरेंद्र मोदी और सारी दुनिया के मंत्रियो के पास पाहूनच जाये. ताकी इन जानवरोको सजा मिले. वो भी कैसा इन्सान जो इसको देख कर तदप न जाये और इस व्हिडीओ को शेअर नहीं करे.’ असाही मजकूर त्या ग्राफिक्स वर आहे.

Source: Whatsapp

हाच व्हिडीओ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्यावेळी भाजप कार्यकर्त्याच्या हत्येचा (bjp worker killed) असल्याचे दावे व्हायरल होत होते.

उत्तर प्रदेशच्या ‘हिंदू जागरण मंच’शी संबंधित चौधरी अमित सिंह यांनी हा व्हिडीओ ट्विट केलाय. ट्विटच्या कॅप्शनमध्ये अमित सिंह लिहितात,

“मेरे पति को घर से घसीट कर ले गए टीएमसी के लोग और बोले अब बोल जय श्री राम. अब कहां है तेरे भाजपा वाले अब कहां है तेरे हिंदू अब कौन तुझे बचाएगा यह कह कर उन्होंने मेरे पति को गंगापुर राणाघाट पर मार दिया

उत्तम घोष की पत्नी(बंगाल)

दैनिक भास्कर अखबार के इंटरव्यू का अंश!

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

  • व्हायरल व्हिडीओ काही सेकंद बघितला की लगेच हा व्हिडीओ भारतातील नाही हे लक्षात येते. त्यामुळे व्हिडीओचे मूळ शोधण्यासाठी आम्ही यांडेक्स रिव्हर्स सर्चची मदत घेतली.
  • व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या यांडेक्सवर शोधल्या असता आम्हाला ब्राझीलमधील अनेक पोर्टलवर साधारणतः तीन वर्षांपूर्वी या घटनेशी संबंधित पोर्तुगीज भाषेतील रिपोर्ट बघायला मिळाले. हे रिपोर्ट भाषांतरित केले असता संपूर्ण घटनेची माहिती मिळाली.
Source: esquerdadiario
  • ब्राझीलमधील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार व्हिडिओत दिसणाऱ्या पीडित व्यक्तीचे नाव ‘वेस्ले टियागो डे सॉसा कारवाल्हो’ असे आहे. कारवाल्होवर कुऱ्हाड, कुदळ आणि दगडांनी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटविण्यात आली होती आणि त्यातील दोघांना अटक देखील करण्यात आली होती.
  • दोन प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांमध्ये आपापसांत झालेल्या वादामुळे वेस्ले टियागोवर हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यात टियागो मारला गेला होता. सहाजिकच हे स्पष्ट होते की या व्हिडिओचा पश्चिम बंगालच नाही तर भारताशी देखील काहीएक संबंध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे संपूर्णतः चुकीचे आहेत. बंगाल हिंसाचारातील भाजप कार्यकर्त्याच्या हत्येचा (bjp worker killed) म्हणून शेअर केला जात असलेला व्हायरल व्हिडिओ भारतातील नसून ब्राझीलमधील घटनेचा आहे.

व्हिडिओत ज्या व्यक्तीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला जात असल्याचं दिसतंय, ती व्यक्ती भाजप कार्यकर्ता उत्तम घोष नसून ब्राझीलमधील टोळीचा सदस्य होता. दोन टोळ्यांमधील परस्पर भांडणांमध्ये त्या व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता.

हे ही वाचा- भाजप कार्यकर्तीवर तृणमूलच्या गुंडांकडून बलात्काराचा दावा करणारा व्हिडीओ निघाला बांगलादेशमधला!

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा