Press "Enter" to skip to content

भाजप कार्यकर्तीवर तृणमूलच्या गुंडांकडून बलात्काराचा दावा करणारा व्हिडीओ निघाला बांगलादेशमधला!

पश्चिम बंगालमधील राज्य सरकार पुरस्कृत हिंसाचारात (bengal violence) तृणमूल काँग्रेसच्या 15-20 गुंडांनी भाजप कार्यकर्ती आणि निवडणूक प्रतिनिधीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली, असा दावा केला जातोय. दाव्याच्या समर्थनात काही पुरुषांकडून एका महिलेला बळजबरीने पळवून नेले जात असलेल्या घटनेचा व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडिओत दिसणारी महिला भाजप कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते राजरोसपणे महिलेला जबरदस्तीने पळवून घेऊन जाताहेत.

TMC goons harassing girl FB viral post

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स गुगल रिव्हर्स इमेजचा मदतीने शोधल्या असता ‘রহমত আলী হেলালী‘ या बांगलादेशी फेसबुक पेजवरून २७ एप्रिल २०२१ रोजी या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ शेअर करण्यात आला असल्याचे आढळून आले.

व्हिडिओ सोबतच्या कॅप्शननुसार बांगलादेशमधील गाजीपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेचं नाव श्रवंती मंडल असून तिने कमरूल इस्लाम नावाच्या तरुणाशी प्रेम विवाह केला होता. मात्र महिलेच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या मदतीने जबरदस्तीने त्या महिलेला आपल्या ताब्यात घेतले होते. व्हायरल व्हिडीओ याच प्रसंगाचा आहे.

व्हायरल व्हिडिओतील महिलेचे वडील शंकर चंद्र मंडल यांनी आपली मुलगी सज्ञान नसल्याचा दावा करत महिला आणि बाल उत्पिडन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.  ‘दौलत खान पोलीस स्टेशन’च्या फेसबुक पेजवरून या घटनेची माहिती देण्यात आली होती. शिवाय या घटनेबाबत गुन्हा दाखल करून घेण्यात आला असून महिलेला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं होतं.

সকলের অবগতির জন্য জানানো যাইতেছে যে, দৌলতখান থানা এলাকায় গত ২৩/০৪/২১ ইং তারিখ গাজীপুর মেট্রো সদর থানার মামলা নং ১৬ তাং…

Posted by Daulatkhan Thana on Sunday, 25 April 2021

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडिओचा बंगाल हिंसाचाराशी (bengal violence) काहीही संबंध नाही.

ना व्हायरल व्हिडिओत दिसणारी महिला भाजप कार्यकर्ती आहे, ना व्हिडीओ पश्चिम बंगालमधील घटनेचा आहे. मूळ व्हिडीओ बांगलादेशमधील गाजीपूर जिल्ह्यातील घटनेचा असून संबंधित प्रकरणी बांगलादेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा- पश्चिम बंगाल हिंसाचार: सोशल मीडियावर फेक न्यूजचा पूर!

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा