Press "Enter" to skip to content

बिहारमधील सत्ता जाताच सुरु झाले राज्यातील भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले? वाचा सत्य!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपशी काडीमोड घेऊन राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे. गेली दोन वर्षे सत्तेत असणारी भारतीय जनता पार्टी आता राज्यात मुख्य विरोधी पक्षाच्या रूपात आहे.

Advertisement

आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये काही लोकांना मारहाण केली जात असताना बघायला मिळतेय. हा व्हिडीओ बिहारमधील असून राज्यातील सत्ता जाताच भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले सुरु झाले असल्याचे दावे केले जाताहेत. बिहारमध्ये गुंडाराज परत येत असल्याचे आरोप केले जाताहेत.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता टाईम्स नाऊच्या युटयूब चॅनेलवर 6 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये व्हायरल व्हिडीओचे फुटेज बघायला मिळाले.

बातमीनुसार व्हिडीओ पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील खादिनान मोड येथील घटनेचा आहे. भाजपच्या 5 ऑगस्ट 2022 रोजीच्या रॅलीदरम्यान तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजुमदार (Asit Majumdar) यांच्या समर्थकांनी रॅलीत सहभागी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली होती.

प्रभात खबरच्या बातमीनुसार स्वतः असित मजुमदार यांनी देखील भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. असित मजुमदार यांनी आरोप केला होता की ते विधानसभेच्या स्थायी समितीची बैठक आटोपून परत येत होते. आपल्या गाडीतून जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली. ही बातमी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओचा बिहारमधील सत्तापालटाशी काहीही संबंध नाही. व्हायरल व्हिडीओ बिहारमधील नसून पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील आहे.

हेही वाचा- पगार मागितला म्हणून भाजप आमदाराने कामगारास केली मारहाण? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा