Press "Enter" to skip to content

हिजाब विवाद: बुरख्यातील आंदोलक महिलांवर गटाराचे पाणी फेकल्याचे दावे फेक! वाचा सत्य!

कर्नाटकात हिजाब विवाद (Hijab controversy) तीव्र होत असताना देशाच्या इतर भागातही त्याचे पडसाद उमटत आहेत. मुख्यत्वे सोशल मिडियातून दोन्ही बाजूने सतत वाद पेटता ठेवला जातोय. आता दावा केला जातोय की तमिळनाडूतील हिंदू समुदायाने हिजाबसाठी आंदोलन करणाऱ्या मुस्लीम महिलांवर गटाराचे पाणी फेकून आंदोलन बंद पाडले.

Advertisement

‘मद्रासी नहीं डरते किसी से भी। जो पहनेगा हिजाब नाली के पानी से होगा हिसाब. तमिलनाडु की सड़कों पर बुरका पहनकर हिजाब के लिए प्रदर्शन कर रही मुस्लिम महिलाओं पर हिन्दुओ ने नाली का पानी फेंककर खदेड़ा। अब भारत का हिन्दू जाग रहा है इसलिए आतंकवादी अब भाग रहा है।’

अशा कॅप्शनसह एक व्हिडीओ शेअर केला जातोय. यामध्ये महिलांवर रस्त्याच्या कडेचे घाण पाणी फेकल्याचे दिसतेय, महिला पळताना दिसतायेत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश घरत, विजय देशमुख, चंद्रकांत कापुरे यांनी ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केलीय.

FB claims of tamilnadu hindu boys thrown drainage water on muslim protester ladies
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या असता २३ फेब्रुवारी २०१९ रोजी फेसबुकवर अपलोड करण्यात आलेला आताच्या व्हायरल व्हिडीओशी तंतोतंत जुळणारा व्हिडीओ आम्हाला सापडला.

Source: facebook

या पोस्टमध्ये वापरलेली भाषा तमिळ आहे. त्याचे आम्ही भाषांतर करून पाहिले असता असे समजले की सदर व्हिडीओज श्रीलंकेतील ईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या रॅगिंगचे आहेत. याच आधारे सर्च केले असता ‘नाऊ न्यूज’ने युट्युबवर अपलोड केलेला हाच व्हिडीओ आम्हाला सापडला. त्यातही व्हिडीओ श्रीलंकेचा असल्याचेच सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की बुरखा परिधान केलेल्या मुस्लीम आंदोलक स्त्रियांवर तमिळ हिंदूंनी गटाराचे पाणी फेकल्याचे दावे फेक आहेत. या दाव्यासह व्हायरल होत असणारा व्हिडीओ २ वर्षे जुना असून श्रीलंकेतील आहे.

हेही वाचा: हिजाब विवाद: पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या बुरखाधारी महिला नव्हे पुरुष असल्याचे उघड?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा