Press "Enter" to skip to content

मंदिराच्या पुजाऱ्यासोबत चित्त्याचा परिवार येऊन झोपत असल्याचे व्हायरल दावे फेक! वाचा सत्य!

राजस्थानातील मोच्छ-सिरोही भागातील पिपलेश्वर महादेव मंदिराच्या (Pipleshwar Mahadev) पुजाऱ्यास आपले मानून एक चित्त्याचे कुटुंब सोबत झोपण्यास येते. अशा प्रकारचे दावे एका व्हिडीओसह व्हायरल होतायेत. व्हिडिओत खरोखर एका व्यक्तीच्या कुशीत झोपायला गेलेला चित्ता दिसत आहे.

Advertisement

“यह व्हिडीओ पिपलेश्वर महादेव मंदिर मोछाल (सिरोही’ का है. हर रोज ये चिता परिवार मन्दिर के सेवक को अपना समझ कर उनके साथ सो जाते है!” या अशा कॅप्शनसह तो ५९ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप अशा सर्वच माध्यमांतून हे दावे जोरदार व्हायरल होतायेत.

An archived version of this page can be seen <a href="http://archive.is/2gTII">here</a>.
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांचे एक ट्विट आम्हाला मिळाले. त्यांनी हा व्हिडीओ १० जून २०२० रोजी ट्विट केला होता. त्यातील कॅप्शनमध्ये ‘VC Dolph C Volker’ या नावाचा उल्लेख केला आहे.

हे ‘VC Dolph C Volker’ नेमके कोण? या नावाने आम्ही गुगल सर्च केले असता २१ जानेवारी २०१९ रोजी वोकर यांनी युट्युबवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला. हा व्हायरल व्हिडीओचा मूळ मोठा व्हिडीओ आहे.

हे वोकर नेमके कोण?

डॉल्फ सी वोकर हे दक्षिण आफ्रिकेतील प्राणीशास्त्राचे अभ्यासक आहेत. दक्षिण आफ्रिकेतीलच ‘चिता ब्रीडिंग सेंटर’मध्ये त्यांनी हा ‘द चिता एक्स्पेरियन्स’ केला होता. यातून त्यांना प्राण्यांचा अभ्यास करायचा होता. सदर प्रयोगासाठी तीन चित्त्यांसह काही रात्री राहण्याची त्यांना स्पेशल परवानगी मिळाली होती. त्यांनी अशाप्रकारचे व्हिडीओज त्याच्या फेसबुक, ट्विटर अकाऊंटवरूनही पोस्ट केले आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की राजस्थानातील पिपलेश्वर महादेव मंदिराच्या पुजाऱ्यासोबत चीत्याचा परिवार येऊन झोपत असल्याचे व्हायरल दावे फेक आहेत. ज्या व्हिडीओच्या आधारे हे दावे केले जातायेत तो व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील असून, त्यात दिसणारी व्यक्ती प्राणीशास्त्रज्ञ ‘ डॉल्फ सी वोकर’ आहे.

हेही वाचा: मोदींच्या आदेशाने रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेल्या मुस्लीम घरांत आढळली पुरातन हिंदू मंदिरे? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा