Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचा व्हिडीओ भारतातील नाही!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लहानग्या मुलास बेदम मारहाण करत असल्याचे बघायला मिळतेय. हा व्हिडीओ गुजरातच्या बलसाड येथील राजबाग परिसरात असणाऱ्या ‘डीपीएस स्कूल’ मधील असून लहान मुलास बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव ‘शकील अहमद अन्सारी’ (shakeel ahmed ansari) असल्याचे सांगण्यात येतेय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांच्या अनुषंगाने काही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता असे लक्षात आले की हे दावे २०१९ सालापासून व्हायरल होतायेत. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज पोर्टल्सने याविषयी बातम्या प्रसारित केल्या आहेत.

माध्यमातील प्रसिद्ध बातम्यांनुसार व्हिडीओ भारतातील नसून ईजिप्तमधील एका अनाथाश्रमातील आहे. ओस्मा मोहम्मद ओथमन असे व्हिडीओतील व्यक्तीचे नाव आहे. हा त्या अनाथाश्रमाचा व्यवस्थापक आहे.

मुलांना मारहाण करत असताना त्याच्याच पत्नीने हा व्हिडीओ शूट केला होता. याविषयी ‘डेली मेल‘ने ५ ऑगस्ट २०१४ रोजी बातमी प्रसिद्ध केली होती.

Source: Daily Mail

बीबीसी‘च्या २०१४ सालच्याच बातमीनुसार ओस्मा मोहम्मद ओथमन याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेथील पोलिसांनी त्यावर कायदेशीर कारवाई केली. न्यायालयाने त्यास २ वर्षाच्या सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच तिसऱ्या वर्षाच्या साध्या करावासासह ११० डॉलर एवढा दंड देखील ठोठावला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार व्हायरल दावे फेक असून लहान मुलांना अमानुष मारहाण करत असलेल्या व्यक्तीचा व्हायरल व्हिडीओ भारतातील नव्हे तर ईजिप्तमधील आहे. व्हिडीओतील व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली असून त्यास सक्त मजुरीचा कारावास आणि दंड अशी शिक्षा भोगावी लागलीय. व्हिडिओत लहानग्यांना विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘शकील अहमद अन्सारी’ नसून ओस्मा मोहम्मद ओथमन असे आहे.

हेही वाचा: आदिवासी महिला भारताची राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द केले पाहिजे असे आंबेडकर म्हणाले होते का?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या 9172011480‘ या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा