Press "Enter" to skip to content

‘लव्ह जिहाद’मध्ये ‘प्रेरणा व्यास’चा खून दाखवण्यासाठी वापरलेले फोटो भलत्याच मुलींचे!

“लव्ह जिहाद’ म्हणून हिणवल्या गेलेल्या हिंदू-मुस्लीम विवाहाचा शेवट म्हणजे हिंदू मुलीचा मृत्यू!’ असे चित्र उभे करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात फिरत आहेत. प्रेरणा व्यास नावाच्या मुलीने लव्ह जिहादचा शेवटचा टप्पा पार केला, तिचा खून झाला असा दावा करण्यात येतोय. (prerna vyas love jihad)

Advertisement

‘प्रेरणा व्यास ने लव जिहाद का आखिरी पड़ाव पास कर लिया , शादी से पहले ही इसका नामकरण आयशा खान हो गया था , 22 अक्टूबर 2019 को मुस्लिम रिवाज़ से शादी की और आज मृत्यु को प्राप्त हुई ।।
जो हिन्दू लड़कियां , हिन्दू लड़के को छोड़ मुसलमानों के प्रेम जाल फसेंगी उस हर हिंदू लड़की का यही अंजाम होगा ।। खैर सेकुलरिज्म का कीड़ा घुसा है वो अभी भी कहेगी मेरा वाला ऐसा नहीं है ।’

अशा मजकुरासह फेसबुकवर तीन फोटोजच्या मदतीने हे दावे करण्यात येत आहेत. ‘लग्न पत्रिका, युवतीचे शव आणि मृत्युपूर्वीची ती’ असे ते तीन फोटोज आहेत. (prerna vyas love jihad)

https://www.facebook.com/photo?fbid=178754707096084&set=gm.632419427475288

अर्काइव्ह लिंक

अनेक फेसबुक युजर्सने या पोस्टचे स्क्रिनशॉट पोस्ट केलेत तर अनेकांनी हे फोटो वेगवेगळे पोस्ट करून ‘प्रेरणा व्यास’या युवतीच्या नावाने लाखोली वाहिलीय. (prerna vyas love jihad) ट्विटरवर देखील अनेकांनी या पोस्ट शेअर केल्या आहेत. आशिष तिवारी या ट्विटर युजरने केलेल्या ट्विटला ५१६ लोकांनी रीट्विट केलेय.

अर्काइव्ह लिंक

व्हॉट्सऍपची सुद्धा असेच दावे दणदणीत फॉरवर्ड होतायेत असे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक रोहन वर्तक यांनी निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’द्वारे पडताळणी करताना आम्ही सर्वात आधी प्रत्येक फोटो रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला आणि एकेक सत्य समोर येऊ लागले.

युवतीचे शव:

दाव्यात वापरलेला युवतीच्या शवाचा फोटो २०१८ मधील आहे. १२ सप्टेंबर २०१८ रोजी DNAने पब्लिश केलेल्या बातमीनुसार बंगाल मध्ये आपल्या मुलीचे हिंदू मुलाशी प्रेमसंबंध आहेत म्हणून मुस्लीम बापाने मुलीचा खून केला.

DNA news report to tell honour killing checkpost marathi
Source: DNA

मृत्युपूर्वीचा युवतीचा फोटो:

प्रेरणा व्यास कोण होती हे दाखवण्यासाठी वापरण्यात आलेला फोटो आम्ही ‘यांडेक्स’ वर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला तेव्हा लक्षात आले की ही युवती ‘प्रेरणा व्यास’ नसून २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘प्रेमा जनता’या तेलुगु चित्रपटात काम केलेली अभिनेत्री सुमाया आहे. चित्रपटात परिधान केलेल्या शाळेच्या गणवेशातीलच तिचा फोटो व्हायरल पोस्ट मध्ये वापरण्यात आलाय.

लग्नपत्रिका:

व्हायरल पोस्टमधील पत्रिकेत लग्नाची तारीख २२ ऑक्टोबर २०१९ लिहिलेली आहे. व्हायरल पोस्टनुसार ‘लव्ह जिहाद’मध्ये खून झालेल्या युवतीचे लग्न २०१९ मध्ये झाले पण वस्तुस्थितीनुसार तिचा खून वर्षभर आधीच म्हणजे २०१८मध्येच झाला होता. हे अतार्किक आहे.

wedding card of prerna vyas checkpost marathi
Source: Twitter

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावा खोटा सिद्ध झालाय. (prerna vyas love jihad) पोस्टमध्ये फिरवण्यात येणारे तीनही फोटो एकमेकांशी दुरान्वयेही संबंधित नाहीत. बंगाल मधील ‘ऑनर किलिंग’मध्ये मृत पावलेल्या युवतीचे शव, तेलुगु चित्रपटातील अभिनेत्री आणि २०१९ पासून व्हायरल होणारी लग्नपत्रिका एकत्र करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम कुणीतरी जाणीवपूर्वक करत आहे.

अशा पोस्टवर विश्वास ठेऊ नका. व्हायरल पोस्ट पडताळण्यासाठी आणि रोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी ‘चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या व्हॉट्सऍप क्रमांकार संपर्क साधा.

हेही वाचा: ‘इस्लाम जिंदाबाद’चे नारे देणारे लाखो मुस्लीम आंदोलक भारतातील नाहीत! मग कुठले?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा