Press "Enter" to skip to content

आसेगाव पूर्णाच्या त्या आक्रस्ताळ्या विहिरीचा व्हिडीओ आणि व्हायरल दावे निव्वळ फेक! वाचा सत्य!

अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा (Asegaon Purna) येथील शेतकरी महेंद्र भगत (Mahendra Bhagat) यांच्या विहिरीचे खोदकाम चालू असताना एवढे जोरदार पाणी लागले की त्यातच ५ मजुरांचा मृत्यू झाला. पाणी इतक्या प्रचंड वेगाने बाहेर येतंय की, कुणी जवळ सुध्दा उभं राहू शकतं नाही, अशा प्रकारच्या दाव्यांसह एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement

व्हायरल दावा:

‘महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पुर्णा. येथील शेतकरी, महेंद्र भगत. यांच्या शेतात विहिर खोदते समयी. अचानक इतक्या वेगाने पाणी बाहेर आलं की,विहिरीत काम करणा-या 5 मजुरांचा पाण्यात बुडून जागेवरच मृत्यू झाला. सांगतील जातंय की, पाणी इतक्या प्रचंड वेगाने बाहेर येतंय की, कुणी जवळ सुध्दा उभं राहू शकतं नाही. पहा निसर्गाचा चमत्कार.’

‘चेकपोस्ट मराठी’च्या अनेक वाचकांनी व्हॉट्सऍपवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

  • व्हायरल दाव्याप्रमाणे विहीर खोदकाम करताना ५ मजुरांचा मृत्यू झाल्याची बाब धक्कादायक आणि मोठ्या बातमीचा विषय असणारी आहे. परंतु ‘चेकपोस्ट मराठी’ला यासंबंधी कोणत्याही वृत्तपत्रात किंवा वाहिनीवर बातमी आढळली नाही.
  • ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी यांच्या सहकार्याने आसेगाव पूर्णा बस स्थानकानजीक कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालविणाऱ्या आशिष मेहत्रे यांचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यांच्याकडे सदर घटनेची विचारणा केली असता त्यांनी तो व्हिडीओ आणि दावे फेक असल्याचे सांगितले.
  • ‘चेकपोस्ट मराठी’ने आसेगाव पूर्णाच्या पोलिस स्टेशनमध्ये सहाय्यक निरीक्षक पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनीही सदर व्हायरल दावे फेक असल्याचे सांगितले. ५ मजूर त्या घटनेत मृत्युमुखी पडले आणि पोलीस स्टेशनला माहिती नाही, असे होऊच शकत नाही असेही ते म्हणाले. मुळात तो व्हिडिओ या परिसरातील नाही असे त्यांनी सांगितले, विहिरीला एवढे पाणी लागल्याची घटना पंचक्रोशीत लपून राहणार नाही.
  • आम्ही स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला असता सदर व्हिडीओ जुना असून तो पाईपलाईन फुटल्याचा व्हिडीओ असल्याची माहिती त्यांनी दिली. जर व्हिडीओ निरखून पाहिला तर लक्षात येईल की विहीर खोदल्यास बाहेर निघणारे दगड माती एवढे कमी असू शकणार नाहीत किंवा एवढे कमी दगड माती निघेल एवढ्या वरचेवर इतके जोरदार उसळी मारेल असे पाणी लागणे शक्य नाही. व्हिडीओमध्ये जवळच पाण्याची टाकी दिसत आहे. कदाचित तीच पाईपलाईन फुटली असावी.
Water tank near storied well
  • खोदकाम करताना पाईपलाईन फुटल्यावरच असे पाणी बाहेर येण्याची जास्त शक्यता आहे. अर्थात ‘चेकपोस्ट मराठी’ ती पाईपलाईनच असल्याची स्वतंत्रपणे खात्री करू शकले नाही परंतु व्हायरल दावा तर्काच्या कसोटीवर खरा उतरत नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथील कथित विहिरीचा व्हिडीओ आणि त्यासोबतचे व्हायरल दावे निव्वळ फेक आहेत.

हेही वाचा: हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरलाच हार्ट अटॅक आल्याचे दर्शवणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज सोबतचा दावा चुकीचा!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा