दादरमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कभोवती दिवाळी सणानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात ‘ईद मिलाद उन नबी’ असे स्क्रोल होत असलेल्या लाईट्स दिसत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. (Shivaji Park Eid lighting)
भाजप नेते नितेश राणे आणि प्रतिक करपे यांनी हा व्हिडीओ ट्विट करत महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे.
‘फशिवशेणा पूर्णपणे हिरवी झाली’, ‘सरकारी मंत्र्यांचा खतना झाला की काय?’,’उद्धवा अजब तुझे सरकार’ अशा विविध कॅप्शनसह हा व्हिडीओ सोशल मीडियात फिरतोय.
फेसबुकवरही या दाव्यांना मोठे उधान आले आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सचिन शिंदे, राजेंद्र काळे, प्रीती अय्यर, डॉ. उदय प्रसादे आणि अनिल म्हापसेकर यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओची पडताळणी करण्याआधी (Shivaji Park Eid lighting) व्हिडीओचे बारकाइने निरीक्षण केले. यामध्ये कॅमेरा उजव्या बाजूला फिरल्या नंतर एक कमान दिसून येत आहे.
या कमानीवर असलेला फोटो आणि इतर मजकूर यात दिसत नाही त्यामुळे आम्ही युट्युबवर ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’च्या या रोषणाईचा नुकताच अपलोड केलेला व्हिडीओ मिळवण्याचा प्रयत्न केला. काल १ नोव्हेंबर २०२१ रोजीच हा व्हिडीओ अपलोड झाला आहे. यामध्ये त्या कमानीवर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ असे स्पष्टपणे लिहिलेले दिसतेय. तसेच त्यावर ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे’ यांचा फोटो आहे.
या माहितीची खातरजमा आम्ही केली असता असे समजले की गेल्या ६ वर्षांपासून मनसे शिवाजी पार्कला दिवाळीनिमित्त विद्युत रोषणाई करते. ट्विटरवर मनसेच्या अधिकृत हँडलवरून यंदाही रोषणाई केल्याचे सांगितले आहे.
वरील माहितीतून हे स्पष्ट होतेय की या (Shivaji Park Eid lighting) विद्युत रोषणाईशी महाराष्ट्र सरकार, ठाकरे सरकार, महाविकास आघाडी किंवा शिवसेनेचा काहीएक संबंध नाही.
परंतु मग मनसेने दिवाळी निमित्त केलेल्या या रोषणाईमध्ये ‘ईद’च्या शुभेच्छा कश्या? या संबंधी मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर’ येथे दिवाळीनिमित्त झालेल्या विद्युत रोषणाईशी ठाकरे सरकार किंवा शिवसेनेचा संबंध नाही. ती रोषणाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. रोषणाईच्या ‘एलईडी’ लाईट्समध्ये ‘ईद’च्या शुभेच्छा देण्यामागे तात्रिंक बाब आहे, त्यावेळी नेमकी टेस्टिंग चालू होती असे मनसे नेत्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: ठाकरे सरकारच्या काळात मुंबई पोलिसांनी गाडीवर भगवा ध्वज फडकवायला बंदी घातलीय?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]
आपल हा चेक पोस्ट फक्त सेनेच्या बातम्या साठी असावी… अहो शिवतीर्थावर कायम स्वरूपी रोषणाई करण्याच महापालिकेने ठरवले …त्यानिमित्त व दिवाळीचे औचित्य साधुन उद्यान गणेशाच्या पाठी काहीवेळासाठी हे दिसल होत…संकष्टीच्या दिवशीच मी ते बघीतलय काहीजण recording करत होते…पण नंतर ते लगेच उतरवण्यात आल…..
आपण हुशारीने हे मनसेच्या नावावर फाडायचा गलिच्छ प्रयत्न केलाय….मनसे ची रोषणाई दोन दिवसाने सुरू झालीय…..कृपया चेकपोस्टने एकदम न्यायाधीशाच्या भुमिकेने लोकांना भरकटवु नये…..🙏
सामना व चेकपोस्ट एकसारखच आहे पक्षिय भुमिकेत
अमेय खोपकर मनसेचे नेते आहेत. त्यांनी स्वतः याविषयी ट्विट करून स्पष्टीकरण दिले होते. कदाचित आपली माहिती चुकीची आहे किंवा मनसे नेते अमेय खोपकर यांची. तुम्हीच सांगा, कोण चुकीचं असू शकतं?