Press "Enter" to skip to content

‘१ जून’ नंतरची ‘अनलॉक’ नियमावली सांगणारा TV9 मराठीचा व्हायरल व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा!

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढली. त्या अनुषंगाने राज्य सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे. १ तारखेनंतर तरी लॉकडाऊन खोलणार की नाही याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच सोशल मीडियामध्ये ‘१ जून’ नंतर कसे टप्प्याटप्प्याने अनलॉक होणार आहे याची नियमावली (unlock guidelines maharashtra) सांगणाऱ्या TV9 मराठीच्या बातमीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Advertisement

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक गुरुप्रसाद पाटील यांनी विविध ग्रुप्समध्ये व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. व्हिडीओच्या वर व्हॉट्सऍपने ‘Forwarded many times’ असा टॅग देखील दिला आहे.

Whatsapp viral tv9 marathi news
Source: Whatsapp

पडताळणी:

व्हायरल दाव्याची पडताळणी करताना आमच्या समोर आलेली माहिती पुढीलप्रमाणे-

१. जून महिन्यात लॉकडाऊन उघडणार का?

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिल रोजी लागू झालेले लॉकडाऊन १ मे पर्यंत चालले. त्यानंतर ते १४ मे पर्यंत वाढवले गेले आणि पुढे पुन्हा १ जूनपर्यंत वाढवण्यात आले. या नंतर लॉकडाऊन राहील की नाही? नियमावलीत बदल होतील का? या संबंधी राज्य सरकारकडून अधिकृतरीत्या कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.

कालच १९ मे रोजी CNBC ने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल होणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी कोव्हीड रुग्णांची आकडेवारी पाहूनच यावर निर्णय होईल असे उत्तर ठाकरे यांनी दिले होते. यावेळी त्यांनी तिसऱ्या लाटेसंबंधी कशा पद्धतीने तयारी केली जात आहे याविषयीची देखील माहिती दिली.

२. व्हायरल व्हिडीओचे सत्य काय?

व्हायरल व्हिडीओ ‘TV9 मराठी’ या वृत्तवाहिनीचा आहे. यामध्ये ‘अनलॉक ५.०’ असा उल्लेख आहे. याच कीवर्ड्सच्या आधारे सर्च केले असता TV9च्या अधिकृत युट्युब चॅनलवर तोच व्हायरल व्हिडीओ आम्हाला सापडला. परंतु हा व्हिडीओ आताचा नसून ३१ मे २०२० रोजी अपलोड केलेला आहे. म्हणजेच यातील बातमी मागच्या वर्षीच्या ‘अनलॉक’ संबंधी (unlock guidelines maharashtra) आहे.

TV9 Marathi unclock 5 news
Source: Youtube

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की राज्यातील लॉकडाऊन १ जून नंतर संपणार किंवा नियम शिथिल होणार यासंबंधी कुठलेही अधिकृत वक्तव्य शासनाकडून प्रसिद्ध झाले नाही. ‘TV9 मराठी’च्या बातमीचा व्हायरल व्हिडीओ मागच्या वर्षीचा आहे.

हे ही वाचा: ‘केंद्र सरकार दरमहा ३५०० रुपये बेरोजगार भत्ता देणार, रजिस्ट्रेशन करा’ लिहिलेले मेसेज फेक!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा