एक महिला तिच्या लहानग्या बाळाला अतिशय निर्दयीपणे मारहाण करत असल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. दीड दोन वर्षाच्या त्या लेकराच्या तोंडातून रक्त येतेय, पाठीवर व्रण उठले आहेत अशी ती दृश्ये पाहून मन पिळवटून निघतेय.
‘ही महिला कोणत्या गावची आहे बघा. हा व्हिडीओ इतका व्हायरल करा,व्हाट्सएप, फेसबुक वर. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना मदत होईल जेणेकरून तिच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल.’
अशा मजकुरासह ते व्हिडीओज फेसबुक, युट्युब आणि व्हॉट्सऍप अशा विविध समाज माध्यमांवर आणि मेसेंजरवर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक विजय चौधरी, डॉ. विठ्ठल घुले, सुमित दंडूके, सुनील गिरकर आणि सुधीर सोनटक्के यांनी आमच्या निदर्शनास हे व्हिडीओज आणून देत पडताळणीची विनंती केली.
- विविध कीवर्ड्सच्या माध्यमातून गुगल सर्च केले असता ‘इंडिया टुडे’ची ३० ऑगस्ट रोजीची बातमी वाचण्यात आली. बातमीनुसार व्हायरल व्हिडीओ निदर्शनास आल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी आंध्रप्रदेशातील चित्तूर येथील २२ वर्षीय महिलेला अटक केली आहे.
- त्या महिलेचे नाव ‘तुलसी’ असे असून पाच वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. त्या लग्नातून तिला २ अपत्ये झाली. ४ वर्षाचा गोकुळ आणि २ वर्षाचा प्रदीप.
- ‘इंडियन एक्स्प्रेस’ने यासंबंधी विस्तृत बातमी केली आहे. गिंगी पोलिस उपअधीक्षकांनी या घटनेविषयी विस्तृत माहिती दिली आहे.
“पोलिस जबाबात तुलसीने असे सांगितले की ती आणि तिचे पती चेन्नईला राहत असताना तिला एक मिस कॉल आला. याचाच मागोवा घेत तिची मिस कॉल देणाऱ्या प्रेमकुमार सोबत ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबध निर्माण झाले. हे दोघे व्हिडीओकॉलवर बोलत असत. त्यात त्याने तिला असे सांगितले की तुझा छोटा मुलगा तुझ्या मोठ्या मुला इतका सुंदर दिसत नाही. तो त्याच्या वडीलांसारखा कुरूप दिसतो. किंबहुना त्याचा जन्म सातव्या महिन्यात झाल्याने तिचे सुद्धा सौंदर्य कमी झाले आहे. याच रागात ती त्या छोट्या बाळाला एवढ्या निर्दयीपणे मारत असे आणि तिच्या प्रियकरास व्हिडीओ पाठवत असे.
ज्या वेळी तिचे शेजारी त्या बाळाच्या जखमांविषयी विचारत तेव्हा ती खेळताना पडला वगैरे अशी करणे देत असे. तुलसीला तिच्या नवऱ्यापासून फारकत घेऊन प्रियकराशी लग्न करायचे होते त्यामुळे ती नवऱ्याशी सतत भांडत असे. त्यामुळे त्याने तिला तिच्या माहेरी सोडले होते. काही कागदपत्रे घेण्यासाठी तो आला असता तिच्या मोबाईलमधील ते व्हिडीओ त्याला दिसले. त्याने ते नातेवाईकांना पाठवले आणि त्यांच्याकडून व काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले.”
– सी. एलांगोवन (गिंगी पोलीस उपाधीक्षक, तमिळनाडू)
- तिचा प्रियकर प्रेमकुमार फरार आहे, त्याचा मोबाईल देखील बंद आहे. त्याच्या शेवटच्या लोकेशन नुसार पोलीस त्यास चेन्नईला शोधण्यासाठी रवाना झाले आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे आवाहन:
त्या महिलेवर कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे. आता ते बाळ देखील सुखरूप आहे. त्यातील हिंसेमुळे इतरांच्या मनावर कळत नकळत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे व्हिडीओज फॉरवर्ड करणे थांबवावे.
लहान बालकांवर अत्याचाराची अशी काही प्रकरणे निदर्शनास आल्यास आपण 1098 या हेल्पलाईनवर कॉल करून त्याविषयीची माहिती कळवू शकता.
हेही वाचा: न्याय मागायला गेलेल्या हिंदू मुलीला पाकिस्तानमध्ये वकिलांनीच लाथा बुक्क्यांनी मारले? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]
[…] वाचा: लेकराला रक्तबंबाळ होईपर्यंत मारणाऱ्… व्हायरल व्हिडीओजचे सत्य आले […]