Press "Enter" to skip to content

पुणे रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म तिकिट खाजगीकरणामुळे तब्बल ५० रुपये? काय आहे सत्य?

खासगीकरणामूळे पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ५० रुपये (platform ticket at rs 50) करण्यात आल्याचा दावा प्लॅटफॉर्म तिकिटाच्या फोटोसहित व्हायरल होतोय.

Advertisement

एखाद्या रेल्वे स्टेशनवर कुणा मित्राला, नातेवाईकाला जरी आपण सोडवण्यासाठी गेलात तरी हे प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावे लागते. म्हणजेच फलाटावर फिरण्यासाठी, बसण्यासाठी कुठल्या प्रवासाचे रेल्वे तिकीट किंवा हे प्लॅटफॉर्म तिकीट असणे बंधनकारक असते.

पुणे स्थानकाचे ५० रुपये शुल्क असणारे एक प्लॅटफॉर्म तिकीट (platform ticket at rs 50) सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होतेय. कॉंग्रेस नेत्यांनी या तिकिटाच्या आधारे जोरदार टीका करायला सुरुवात केलीय.

पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही ट्विट करून कॉंग्रेस राज मध्ये असणारं ३ रुपयाचं प्लॅटफॉर्म तिकीट भाजपराज मध्ये ५० रुपये झालंय असं सांगून खाली दोन्ही तिकिटांचे फोटोज जोडले आहेत.

Source: Twitter

मध्यप्रदेशातील कॉंग्रेस नेते अरुण यादव यांनी देखील हे तिकीट शेअर केलेय आणि कॉंग्रेस काळात २ रुपये असणारं हे तिकीट आता ५० रुपये झालं अशी टीका केलीय. (platform ticket at rs 50)

फेसबुकवर देखील अनेकांनी हाच तिकिटाचा फोटो टाकून रेल्वेच्या खाजगीकरणाकडे ईशारा केलाय.

पडताळणी:

चेकपोस्ट मराठीने पडताळणीला सुरुवात करताना सत्य काय ते जाणून घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने याबाबत काही खुलासा केलाय का हे तपासण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे मंत्रालय किंवा रेल्वे विभागाच्या वेबसाईट किंवा मुख्य ट्विटर अकाऊंटवर या संबंधी काही स्पष्टीकरण आढळले नाही.

अजून काहीशा सखोल शोधाशोधीनंतर रेल्वे खात्याच्या प्रवक्त्याचे अधिकृत ट्विटर हँडल ‘Spokesperson Railways’ येथे एक ट्विट सापडले.

पत्रकार प्रशांत कनोजिया यांनी व्हायरल तिकिटाचा फोटो शेअर करत “5 रुपये का प्लेटफॉर्म टिकट 50 रुपये का होगया और कितना विकास चाहिए?” असे कॅप्शन दिले होते. याच ट्विटला रीट्विट करून रेल्वे प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

रेल्वे प्रवक्त्याचे स्पष्टीकरण:

‘पुणे जंक्शन द्वारा प्लेटफार्म टिकट का मूल्य ₹50 रखने का उद्देश्य अनावश्यक रूप से स्टेशन पर आने वालों पर रोक लगाना है जिस से सोशल डिसटेनसिंग का पालन किया जा सके। रेलवे प्लेटफार्म टिकट की दरों को कोरोना महामारी के शुरुआती दिनों से ही इसी प्रकार नियंत्रित करता आया है।’


अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डीस्टन्सिंग राखण्यासाठी पुणे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्यात आल्याचे रेल्वे खात्याच्या ट्विटर अकाऊंट द्वारे सांगण्यात आले. पुणे विभागाच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा यांनी सुद्धा अशाच एका ट्विटवर उत्तर दिले आहे.

रेणू शर्मा, डीआरएम पुणे यांचे ट्विटर:

‘पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाबद्दल काही दिशाभूल करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर दिसत आहेत. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की कोव्हीड१९ मुळे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता.

सध्या तर प्लॅटफॉर्म तिकीट देणेच बंद केले आहे, जर अत्यावश्यक गरज असेल तरच ते दिले जाते तेही आता तात्पुरत्या काळासाठी ५० रुपये शुल्क आकारून.’

वस्तुस्थिती:

कोरोना काळात स्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये. तसेच सोशल डीस्टन्सिंग योग्यरीत्या राखता यावं याकरिता पुणे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ५० रुपये करण्यात आले आहेत. (platform ticket at rs 50)

रेल्वेच्या खासगीकरणामूळे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्यात आल्याचा दावा सध्यातरी चुकीचा असल्याचे चेकपोस्ट मराठीने केलेल्या पडताळणी स्पष्ट झाले. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीनंतर हे तिकीटशुल्क पूर्वपदावर येते की नाही यावरच खाजगीकरणाचे खरे पडसाद लक्षात येतील.

हेही वाचा: अमेरिकेने डॉ. मनमोहन सिंह यांचा जगातल्या ५० प्रामाणिक व्यक्तींच्या यादीत समावेश केलाय?

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा