Press "Enter" to skip to content

भाजपची ‘टिपू सुलतान’वर दुटप्पी भूमिका, महाराष्ट्रात वाद आणि दिल्लीत चित्ररथ? वाचा सत्य!

मुंबईतील एका क्रीडा संकुलास टिपू सुलतान यांचे नाव दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली परंतु याच भाजप शाषित कर्नाटक राज्याने प्रजासत्ताक दिनी ‘टिपू सुलतान’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ प्रदर्शित केला. असे दावे करणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. (Tipu Sultan Tablue)

Advertisement
tipu sultan tablue whatsapp viral
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक यशवंत पाटील आणि अहमद रज्जाक यांनी व्हट्सऍपवर ‘Forwarded many times‘ या टॅगसह जोरदार व्हायरल होत असलेला हा स्क्रिनशॉट निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

अशाचप्रकारचे दावे ट्विटरवरही व्हायरल होतायेत.

पडताळणी:

यावर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताकदिनी राजपथावर कर्नाटकचा चित्ररथ कोणता होता याची शोधाशोध केली असता विविध बातम्यांमधून असे समजले की ‘पारंपारिक कला’ या संकल्पनेवर हा चित्ररथ आधारित होता. स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चटोपाध्याय यांचीही प्रतिमा त्यावर होती. त्यांना ‘भारताच्या पारंपारिक हस्तकलेची जननी’ असे संबोधले जाते.

Source: Deccan Herald

‘टिपू सुलतान’ यांच्यावर आधारित चित्ररथ कधीचा?

व्हायरल दाव्यामध्ये दिसणारा टिपू सुलतान यांचा चित्ररथ नेमका कधीचा हे शोधण्यासाठी आम्ही शोधाशोध असता असे समजले की हा २०१४ सालचा रथ आहे. ‘DD National’ वाहिनीवरून प्रसारित झालेच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ आजही युट्युबवर उपलब्ध आहे. व्हिडीओच्या ०१:३०:४५ मिनिटावर आपण या चित्ररथाची दृश्ये पाहू शकता.

Source: Youtube

२०१४ साली कर्नाटकात भाजपचे सरकार होते?

नाही, १३ मे २०१३ ते १७ मे २०१८ या कालखंडात कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्दरमैया यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे सरकार होते. २०१८ साली येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपने सरकार स्थापन केले होते. याचाच अर्थ प्रजासत्ताक दिनी ‘टिपू सुलतान’ यांच्यावर आधारित चित्ररथ सादर करण्यामागे भाजप नव्हे तर कॉंग्रेस सरकार होते.

टिपू सुलतान ‘हिंदू विरोधी’ होते?

या एकूणच वादाचे कारण सांगताना ‘टिपू सुलतान’ हे अतिशय क्रूर हिंदू विरोधी शासक होते असा दावा केला जातो. याविषयी ‘बीबीसी मराठी‘ने सविस्तर रिपोर्ट प्रकाशित केला आहे. यामध्ये जेएनयूच्या इतिहास विषयाच्या निवृत्त प्राध्यापिका जानकी नायर यांनी सांगितले आहे की,

“याचं कारण म्हणजे ते मुस्लीम होते आणि इतर राज्यकर्त्यांप्रमाणेच तेही शत्रूला निर्दयीपणे संपवत होते. शिवाय आकडेवारी वाढवून सांगितली जात असली तरी, त्यांनी धर्मांतरही करायला लावलं होतं. पण हिंदुबहुल असलेल्या देशात मोठया प्रमाणावर धर्मांतर करून त्यांना राज्य चालवता आलं नसतं”

– जानकी नायर, इतिहास विषयाच्या निवृत्त प्राध्यापिका, जेएनयु

याच रिपोर्टमध्ये शृंगेरी मठाच्या स्वामींना पेशवा रघुनाथ राव पटवर्धन यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी करकाला इथं पळून जावं लागलं होतं असे लिहिले आहे.

“पेशव्यांच्या सैनिकांनी मंदिरावर छापा टाकला. येथील सर्व दागिने घेतले आणि देवाची विटंबना केली, पेशव्यांच्या सैन्यानं लुटल्यानंतर टिपू सुल्तान यांनी पुन्हा मंदिरातलं सर्वकाही पूर्ववत केलं. त्यांनी आपल्या राज्यातील लोकांना आशीर्वाद द्यावे अशी विनंती करणारी अनेक पत्रंही धार्मिक नेत्यांना लिहिली. इतर अनेक मंदिरांमध्येही त्यांनी अशी कामं केली. त्यात नंजुंदेश्वर मंदिराचा समावेश होता. हकीम नंजुंदा यांच्या डोळ्यावर याठिकाणी उपचार झाले होते म्हणून त्यांनी याचं तसं वर्णन केलं.”

– प्राध्यापक एनव्ही नरसिंहय्या

टिपू सुलतान यांनी मेल्कोट, कोल्लूर मुकांबिका या मंदिरांसह इतर मंदिरांना संरक्षण दिलं याच्या नोंदी सरकारी दस्तऐवजांमध्येही आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की व्हायरल दाव्यामध्ये सांगितलेली माहिती चुकीची आहे. ‘टिपू सुलतान’ यांच्यावर आधारित चित्ररथ या वर्षीचा नसून २०१४ सालच्या प्रजासत्ताक दिनाचा आहे. त्यावेळी कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचे शासन होते भाजपचे नव्हे.

हेही वाचा: उत्तर प्रदेशात मते मागायला आलेल्या भाजप नेत्यास जनतेकडून बेदम मारहाण? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा