Press "Enter" to skip to content

गुजरातमध्ये लोकांनी ‘5G टॉवर’ जाळल्याचा दावा करणारा व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा!

सोशल मीडियावर साधारणतः मिनिटभराचा व्हिडीओ शेअर केला जातोय. या व्हिडीओमध्ये एक जाळणारे मोबाईल टॉवर दिसतेय. दावा केला जातोय की हा व्हिडीओ गुजरातमधील ‘5G टॉवर’ चा (5G tower Gujarat) असून या टॉवरला लोकांकडून आग लावण्यात आली आहे.

Advertisement

सुभाषचंद्र या ट्विटर अकाऊंटवरून ‘खबर #गुजरात से..जहां लोगों ने 5G टावर को आग लगा दी है’ या कॅप्शनसह पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ २६२ युजर्सकडून रिट्विट करण्यात आलाय. 

अर्काइव्ह  

‘व्हायरल लाईफ’ नावाच्या युट्यूब चॅनेलवर देखील हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. 5G रेडिएशनमुळे देशात कोरोनाचा प्रसार होत असल्याने 5G च्या टॉवरलाच आग लावण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. 5G मुळे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार होत असल्याने लोकांकडून याविरोधात रोष व्यक्त करण्यात आल्याचं भासविण्याचा प्रयत्न केला जातोय.

अर्काइव्ह 

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला अश्वनी बंसल या युट्यूब चॅनेलवरून २७ जानेवारी २०१८ रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असल्याचे आढळून आले. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शननुसार हा व्हिडीओ हरयाणामधील बरारा येथील असल्याचे समजले.

‘हिंद एक्स्प्रेस टीव्ही’ या स्थानिक न्यूजच्या युट्यूब चॅनेलवरून देखील याच दिवशी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. यानुसार देखील हा व्हिडीओ हरयाणाच्या अंबालामधील बरारा येथील मोबाईल टॉवरला लागलेल्या आगीचा आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारतात अजून 5G सेवेची सुरुवात झालेली नाही. दूरसंचार मंत्रालयाकडून 4 मे 2021 रोजी 13 दूरसंचार कंपन्यांना देशात 5G टेस्टिंग करण्याची परवानगी दिली आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले आहे की सध्या देशात 5G टेस्टिंग सुरु नाही आणि 5G टॉवर देखील बसविण्यात आलेले नाहीत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ संदर्भातील दावा चुकीचा आहे. सदर व्हिडीओ गुजरातमधील (5G tower Gujarat) नसून हरयाणाच्या अंबालामधील बरारा येथील मोबाईल टॉवरला लागलेल्या आगीचा आहे. शिवाय या व्हिडिओचा 5G शी देखील काहीही संबंध नाही. देशात अजून 5G टॉवर्स उभारण्यात आलेले नाहीत.

हे ही वाचा- भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रसारास 5G टेस्टिंग जबाबदार आहे का? 

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा