Press "Enter" to skip to content

एकाच कुटुंबातले तिघे बहीण-भाऊ एकाच वेळी आयपीएस?

एकमेकांच्या शेजारी बसलेल्या ३ आयपीएस ऑफिसर्सचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ते दोन भाऊ आणि एक बहीण असे एकाच कुटुंबात ३ आयपीएस ऑफिसर (3 ips officers in one family) असल्याचा दावा करण्यात येतोय.

Advertisement

एक तर आईपीएस अधिकारी आणि ते देखील एकाच कुटुंबातले, म्हणून हा फोटो मोठ्या कौतुकाने शेअर केला जातोय. हे चित्र अतिशय प्रेरणादायी असल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन केलं जातंय.

अर्काइव्ह पोस्ट

फेसबुकवर इतरही अनेक युजर्सकडून हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.

पडताळणी :

व्हायरल फोटोत दिसणारे अधिकारी नेमके कोण आणि ते खरंच एकाच कुटुंबातील आहेत का हे शोधण्यासाठी आम्ही व्हायरल फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आयपीएस तुषार गुप्ता यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर २२ ऑगस्ट रोजी हा फोटो अपलोड करण्यात आला असल्याचे आम्हाला आढळून आले.

IPS Tushar Insta feed screnshot
Source: Instagram

तुषार गुप्ता यांनी फोटोतील इतर दोन अधिकारी पूजा वशिष्ठ आणि श्रुतकिर्ती सोमवंशी यांना देखील फोटोत टॅग केले होते.

या माहितीच्या आधारे आम्ही पूजा वशिष्ठ आणि श्रुतकिर्ती सोमवंशी यांचे इंस्टाग्राम प्रोफाईल स्कॅन केले. पूजा वशिष्ठ यांच्या अकाउंटवर देखील आम्हाला हाच फोटो २२ ऑगस्ट रोजीच अपलोड करण्यात आल्याचे दिसून आले.

IPS Pooja Vashishth feed screnshot
Source: Instagram

श्रुतकिर्ती सोमवंशी यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर हा फोटो मिळाला नाही, मात्र त्यांच्या प्रोफाईलवरील इतर फोटोजवरून व्हायरल फोटोत दिसणारे अधिकारी श्रुतकिर्ती सोमवंशी हेच आहेत, हे स्पष्ट होते.

तुषार गुप्ता हे पंजाब केडरचे तर पूजा वशिष्ठ या हरियाणा आणि श्रुतकिर्ती सोमवंशी मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल फोटोमध्ये दिसणारे तीन आयपीएस अधिकार एकाच कुटुंबातील (3 ips officers in one family) नाहीत. त्यांच्या वेगवेगळ्या आडनावावरून ते एकाच कुटुंबातील नसल्याचे स्पष्ट होते.

हे ही वाचा- ‘१२वी पास युवकांना सैन्यात थेट भरती’ सांगणारी व्हायरल जाहिरात जुनी!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा