Press "Enter" to skip to content

चीनमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या काही सेकंदापूर्वीचा व्हिडिओ आला समोर? वाचा सत्य!

चीनमध्ये बोईंग 737 या विमानाला काल भयंकर अपघात झाला. या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या 132 प्रवाशांचा जीव गेला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग (Xi Jinping) यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर या अपघाताच्या संदर्भाने एक व्हिडीओ शेअर केला जातोय. हा व्हिडीओ बोईंग 737 या अपघातग्रस्त विमानाचा असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता बुल बॉसफोरस या यूट्यूब चॅनेलवरून 11 मार्च 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला 10 मिनिटे 15 सेकंदांचा व्हिडीओ बघायला मिळाला. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ याच व्हिडिओचा भाग आहे. व्हिडिओच्या 9 मिनिटे 22 सेकंदाच्या टाईम स्टॅम्पला सध्या व्हायरल व्हिडिओ होत असलेला भाग बघता येईल.

व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार हा एक सिम्युलेटर म्हणजेच नकली व्हिडिओ आहे. मात्र हा व्हिडिओ सत्य घटनेवर आधारित आहे.  सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास ढोबळमानाने खऱ्या घटनेचे नाट्यमय रूपांतरण असे म्हणता येईल. इथिओपियन एअरलाइन्सच्या विमान अपघाताचा हा व्हिडिओ सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

इथिओपियन एअरलाइन्सच्या ET302 क्रमांकाच्या B737 मॅक्स 8 या विमानाला 2019 मध्ये अपघात झाला होता. या अपघातामध्ये 157 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याच घटनेचे नाट्य रूपांतरण व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडीओचा चीनमध्ये झालेल्या विमान अपघाताशी काहीही संबंध नाही. शिवाय व्हायरल व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा असून इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाला झालेल्या अपघाताचे हे नाट्य रूपांतरण आहे. व्हिडीओ सॉफ्टवेयरच्या मदतीने बनवण्यात आला आहे.

हेही वाचा- युक्रेनने नरेंद्र मोदींच्या विमानावर मिसाईल डागून त्यांच्या हत्येचा कट रचला होता? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा