सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये कुठलेतरी लोकप्रतिनिधी भाषण देताना दिसताहेत. या भाषणात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या खासगीकरणाच्या धोरणावर टीका करताहेत. दावा केला जातोय की हा व्हिडीओ नेपाळच्या संसदेतील आहे. नेपाळमधील खासदार मोदींना आरसा दाखवताहेत (Nepali mp criticizing narendra modi).
व्हाट्सअपवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. “नेपाळ च्या विधानसभेत चांगलंच सन्मानित करण्यात आले आपल्या यशस्वी माननीय, महामहिम,प्रधानमंत्री.मोदी साहेब यांना कुणी का असेना आरसा दाखवलाच…. सर्वांनी बघण्यासारखा व तितकाच विचार करायला लावणारा Video” असा मेसेज देखील व्हिडिओसोबत फॉरवर्ड केला जातोय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून दि. २१ मार्च रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असल्याचे आढळून आले.
व्हिडिओच्या कॅप्शननुसार सदर व्हिडीओत दिसणारी व्यक्ती किन्नौर येथील काँग्रेस पक्षाचे आमदार जगत सिंह नेगी आहेत. ते हिमाचल प्रदेश विधानसभेत बोलताहेत.
जगत सिंह नेगी यांनी विधान सभेतील आपल्या जवळपास १८ मिनिटांच्या संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ फेसबुक प्रोफाईलवरून शेअर करण्यात केला आहे. आपण आज देखील त्यांच्या त्यांच्या प्रोफाईलवर हा व्हिडीओ बघू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मोदींवरील टीकेच्या व्हिडीओचा नेपाळशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ नेपाळी संसदेतील नसून हिमाचल प्रदेश विधानसभेतील आहे. व्हिडिओत भाषण देत असलेली व्यक्ती नेपाळी खासदार नसून काँग्रेसचे किन्नौर येथील आमदार जगत सिंह नेगी आहेत.
हे ही वाचा- ऑक्सिजन प्लान्टचा निधी राज्य सरकारने गायब केल्याचा भाजप आमदाराचा दावा फेक!
[…] हे ही वाचा: मोदींवरील टीकेचा व्हायरल व्हिडीओ नेप… […]
[…] हे ही वाचा- मोदींवरील टीकेचा व्हायरल व्हिडीओ नेप… […]