सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये आपणास एक इमारत बाहेरून दिसतेय. त्या इमारतीचे मजले चक्क जागा बदलताना, गोल फिरताना दिसतायेत. या एकंदरीत व्हिडीओसोबत दावा केला जातोय की हे दुबईमधील एक हॉटेल आहे.
युट्युबवरही हा व्हिडीओ तशाच आश्चर्यमिश्रित भावनेने शेअर केल्याचे दिसतेय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक ऍड. राजू खरे यांनी सदर व्हिडीओ व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स यांडेक्स सर्च इंजिनवर रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता आमच्यासमोर एक वेबसाईट आली. यावरील माहितीनुसार ही इमारतीला लावलेली मिडिया वॉल आहे. अमेरिकेतील डॅलस येथे असणाऱ्या इमारतीवर ही डिजिटल स्क्रीन आहे. यावर जाहिराती प्रदर्शीत होतात.
‘AT&T Media Wall’ असे युट्युबसर्च केल्यास आपणास या मिडिया वॉलवर प्रदर्शित झालेल्या विविध जाहिरातीही पहायला मिळतील.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी इमारत दुबईमधील हॉटेलची असून त्याचे मजले फिरत असल्याचे दावे फेक आहेत. सदर इमारत अमेरिकेतील असून ते मजले फिरत असल्याचा केवळ आभास आहे. मुळात ती एक भली मोठी स्क्रीन असून ती जाहिरातींसाठी बनविलेली आहे. फिरते मजले ही कम्प्युटर ग्राफिक्सची कमाल आहे. तो एक प्रकारचा व्हिडिओ आहे खरी इमारत नव्हे.
हेही वाचा: पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्यात वाहून जाणाऱ्या पर्यटकांचा ड्रोन व्हिडीओ कारवारचा नाही! वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment