Press "Enter" to skip to content

मोटार सायकलवरून महिलेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या तरुणाचा हा फोटो चार वर्षांपूर्वीचा !

सोशल मीडियावर एक अतिशय हृदयद्रावक फोटो व्हायरल होतोय. फोटोत एक तरुण मोटार सायकलवरून एका महिलेचा मृतदेह घेऊन जात असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरून हा फोटो कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील महिलेच्या मृत्यूचा असल्याचा दावा केला जातोय. अँब्युलन्स न मिळाल्याने मोटार सायकलवरून मुलाला आपल्या आईचा मृतदेह घेऊन जावा लागत असल्याचं सांगितलं जातंय.

Advertisement
https://www.facebook.com/helpingindian/photos/a.1497639657172149/2994491830820250/

अर्काइव्ह पोस्ट

फेसबुकवर इतरही अनेक युजर्सकडून हा फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

पडताळणी:

व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला हिंदुस्थान टाईम्सच्या वेबसाईटवर ४ जून २०१७ रोजी प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो मिळाला.

Source: Hindustan Times

बातमीनुसार ही घटना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील आहे. फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव शंकर शाह असून त्याने आपली पत्नी सुशीला हिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यानच सुशीलाचा मृत्यू झाला. सुशीलाच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह हलविण्यासाठी रुग्णालयाकडून शववाहिका देखील उपलब्ध करून दिली गेली नाही. त्यामुळे सुशीलाच्या पतीला आपल्या मृत पत्नीचा देह मोटार सायकलवरून आपल्या घरी न्यावा लागला होता.

शंकरने त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की रुग्णालय प्रशासनाकडून शंकरलाच अँब्युलन्सची व्यवस्था करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र अँब्युलन्स चालकाने त्यासाठी २५०० रुपयांची मागणी केली. हे २५०० रुपये देण्यास सक्षम नसल्याने शंकरने आपल्या मुलाच्या मदतीने गाडीवरूनच बायको सुशीला हिचा मृतदेह घरी आणला.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो सध्याच्या कोरोना काळातील नसून जवळपास चार वर्षांपूर्वीचा आहे. घटना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील आहे. रुग्णालयात दाखल महिला पेशंटचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाकडून मृतदेह हलविण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध न करून दिली गेल्याने महिलेच्या पतीला आपल्या पत्नीचा मृतदेह मोटार सायकलवरून आपल्या घरी आणावा लागला होता.

हे ही वाचा- एकाच वेळी अनेक मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा फोटो जवळपास 9 वर्षांपूर्वीचा !

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा