fbpx Press "Enter" to skip to content

युपीएससी टॉपर मुलगी वडिलांना रिक्षात बसवून फिरवत असलेल्या व्हायरल फोटोचे सत्य वेगळंच!

‘या महिन्यातील बेस्ट फोटो’ अशा कॅप्शनसह रस्त्यावर रिक्षा ओढणाऱ्या मुलीचा फोटो व्हायरल होतोय. फोटोतील मुलगी सध्याची आयएएस टॉपर असून आपल्या रिक्षाचालक वडिलांना रिक्षातून कोलकाता शहर फिरवत आहे (ias topper auto rickshaw). या कृतीतून ती आपल्या वडिलांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करत असल्याचं सांगितलं जातंय.

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुर्यकांत कांबळे यांनी सदर फोटो व्हॉट्सऍप ग्रुप्समध्ये व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

फेसबूक आणि ट्विटरवर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तामिळनाडूतील काँग्रेस नेते अस्लम बाशा यांनी देखील ऑक्टोबर २०१८ मध्ये ट्विटरवरून हा फोटो शेअर केला होता.

FB post telling rickshaw pulling girl is IAS topper checkpost marathi
Source: Facebook

पडताळणी:

स्पर्धा परीक्षांचे निकाल लागल्यानंतर खडतर परिस्थितीला सामोरे जात यश मिळवणाऱ्या अनेक यशोगाथा प्रमुख माध्यमांतून, सोशल मीडियाद्वारे समाजा समोर येतात. यादरम्यान काही खोटे दावे देखील व्हायरल केली जातात.

गूगल इमेज रिव्हर्स सर्च द्वारे हा फोटो पडताळून पाहिला असता व्हायरल फोटो २०१८,२०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्याचे आम्हाला समजले. त्यावेळी देखील सदरील मुलगी ही कोलकाता येथील रिक्षा चालकाची मुलगी असून तिने  आयएएस परीक्षेत यश मिळवल्याचा दावा करण्यात आला होता.

हाच व्हायरल फोटो आम्हाला wildcraftin ई कॉमर्स साइटच्या अधिकृत  इंस्टाग्राम अकाउंटवरून देखील शेअर करण्यात आल्याचे आढळले. यात फोटोतील मुलगी श्रमोना असल्याचे कळते.

Advertisement

तसेच श्रमोना पोद्दारने देखील तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडल misti.and.meat यावर २८ एप्रिल २०१८ रोजी हा फोटो शेअर केलाय.

 श्रमोना ही एक प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. फोटो शेअर करत तिने कोलकात्यातील रिक्षा चालकांच्या खडतर परिश्रमाविषयी सहानुभूती व्यक्त केलीये. wild craft या ‘clothing e commerce’ साईटच्या #ReadyForevAnything #WildcraftWilding या कॅम्पेनसाठी हा फोटो काढल्याचे सांगितले आहे.

व्हायरल फोटो २०१८ मध्ये मोठ्या प्रमाणात चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात आल्यामुळे श्रमोनाने याविषयी खुलासा करणारी एक फेसबूक पोस्ट देखील ५ ऑक्टोबर २०१८ रोजी  केली होती.

https://www.facebook.com/photo.php?fbid=10212233102733740&set=a.3724161513600&type=3&theater

यात व्हायरल करण्यात आलेला फोटोमूळे तिला त्रासाला सामोरे जावे लागत असून, सदरील फोटो wild craft च्या कॅम्पेन साठी काढण्यात आल्याचे तिने पुन्हा एकदा स्पष्ट केले होते.

वस्तुस्थिती:

रिक्षा चालकाच्या मुलीने आयएएस परीक्षेत यश मिळवत आपल्या वडिलांना रिक्षात बसवून कोलकाता शहरात फिरवल्याचे (ias topper auto rickshaw) सांगत व्हायरल केला जाणारा फोटो खरा आहे. मात्र या फोटोतील मुलगी आयएएस परीक्षेतील टॉपर नसून प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर श्रमोना पोद्दार असून हा फोटो २०१८ मध्ये काढण्यात आलाय.

व्हायरल फोटो खरा असला तरी, त्यात करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. Wild craft या ई कॉमर्स साईटच्या #ReadyForevAnything #WildcraftWilding या  कॅम्पैनसाठी श्रमोनाने हा फोटो काढला होता.

हेही वाचा: कोथिंबिरीच्या उत्पादनातून साडेबारा लाख रुपये कमावणाऱ्या शेतकऱ्याचा व्हायरल फोटो फेक!

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा