इस मुस्लीम व्यक्ती- मोहमद अंसारी को फेमस किजीये, ये जिंदगी में मंदिर जाने के लायक ना बचे !
ह्या कॅप्शनसह एक फोटो सध्या व्हायरल होतोय. घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
फोटोत दिसणारी व्यक्ती एका हिंदू देवतेला लाथ मारत असताना दिसतेय. सोशल मीडियावर दावा केला जातोय की तो धर्माने मुस्लीम असून त्याचं नाव मोहमद अंसारी आहे.
पडताळणी:
व्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही ‘गुगल रिव्हर्स सर्च’ची मदत घेतली. त्यावेळी आम्हाला ‘संजीवनी टुडे’वर २४ एप्रिल रोजी प्रकाशित बातमी सापडली.
‘वाराणसी: मूर्ति के सिर पर पैर रख वीडियो वायरल करना महंगा पड़ा, आरोपित गिरफ्तार’ या हेडलाईनसह प्रकाशित बातमीत प्रकरणाची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
‘संजीवनी टुडे’च्या बातमीनुसार घटना वाराणसीमधील आहे. लॉकडाऊनच्या काळात निर्जन मंदिरात दुर्गा देवीच्या मूर्तीवर पाय ठेऊन व्हिडिओ व्हायरल करणारा हा युवक आजाद कुमार गौतम पुत्र राम करन उर्फ लोधी राम आहे.
करधना गावचा रहिवासी असणाऱ्या या युवकाने आधी दुर्गा देवीच्या मूर्तीवर पाय ठेऊन व्हिडिओ बनवला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर गावकऱ्यांना आणि शेजारील गावातल्या लोकांना देखील तो हा व्हिडिओ दाखवायला लागला.
संबंधित युवकाच्या या हरकतीने गावकरी संतप्त झाले. त्यानंतर करधना गावातीलच युवक रामकुमार याने आझाद कुमार गौतम विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आझाद कुमारला ताब्यात घेतलं.
त्यानंतर आम्हाला ‘वाराणसी : धार्मिक भावनाएं आहत करने के आरोप में एक गिरफ्तार’ या हेडलाईनखाली प्रकाशित ‘अमर उजाला’ची २४ एप्रिल रोजीची बातमी मिळाली.
मिर्जामुरादचे इन्स्पेक्टर सुनील दत्त दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारीनंतर लगेचच आरोपी आझाद कुमार गौतम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मिडियात व्हायरल करण्यात येत असलेले दावे पूर्वग्रहदुषित आहेत.
दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन मूर्तीला लाथ मारणारी व्यक्ती धर्माने मुस्लीम नाही. त्या व्यक्तीचं नाव मोहमद अंसारी असल्याचा दावा फेक आहे.
प्रकरण साधारणतः ३ महिन्यांपूर्वीचं असून दोषी आझाद कुमार गौतम यास वाराणसी पोलिसांनी अटक करून त्याच्यावर धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकरणात खटला चालवला जात आहे.
हे ही वाचा- योगी आदित्यनाथ शहीद सैनिकाच्या शवपेटीजवळ बसून हसत आहेत?
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]