Press "Enter" to skip to content

मध्य प्रदेश सरकारने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी झालेली ‘गफूर वस्ती’ उध्वस्त केल्याचे दावे फेक!

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे मोहरमच्या दिवशी मुस्लीम समुदायाने कथितरित्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याच्या घटनेनंतर या संदर्भाने सोशल मीडियावर अनेक दावे-प्रतिदावे व्हायरल झाले होते. आता सोशल मीडियात अजून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. दावा केला जातोय की मध्य प्रदेशातील शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडून वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आलेली ‘गफूर वस्ती’ (gafoor basti) उध्वस्त करण्यात आली आहे.

Advertisement

‘उज्जैन में जिस गफूर बस्ती के लोगो ने पाकिस्तान जिंदाबाद का नारा लगाया था,, शिवराज सरकार ने पूरी अवैध बस्ती की उजाड़ दी’‘ अशा कॅप्शनसह साधारण २.९ मिनिटाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये खरोखर काही पत्र्याची घरे वगैरे तोडल्याचे दिसत आहे. आसपास बऱ्याच पोलिसांच्या गाड्या आणि फौजफाटा उभा असल्याचे दिसतेय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे, कॉम्रेड भैरवनाथ वाळके, बळीराम पाटील आणि सतीश माळवदे यांनी ट्विटर, फेसबुकसह व्हॉट्सऍपवरही हे दावे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करताना व्हायरल व्हिडिओच्या की फ्रेम्स रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता २८ ऑगस्ट २०२१ रोजी ट्विटरवर अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ सापडला.

‘उज्जैन:शहर के इतिहास की सबसे बड़ी अतिक्रमण हटाने की कार्यवाही AUG 27, 2021 हरिफाटक ब्रिज से लेकर वाकणकर ब्रिज तक 214 अवैध दुकानों को हटाया शासकीय भूमि पर वर्षों से अवैध कब्जा कर बना था गैरेजों का मार्केट’ अशा कॅप्शनसह तो व्हिडीओ ट्विट केला गेलाय.

यातील माहितीच्या आधारे आम्ही गुगल सर्च केले असता ‘दैनिक भास्कर’ने प्रकाशित केलेली बातमी मिळाली. भास्करच्या बातमीनुसार उज्जैनच्या वाकणकर (हरी फाटक) ओव्हर ब्रीज जवळ असलेले अतिक्रमण हटवण्यात आले आहे.

ujjain elligal construction demolished with court order dainik bhaskar news
Source: Dainik Bhaskar

हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार कथितरित्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांची घटना उज्जैनमधील गीता कॉलनीमध्ये घडली होती. ही गीता कॉलनी आणि अतिक्रमण हटवलेला परिसर हरी फाटक उर्फ वाकणकर ओव्हर ब्रिज यांच्यात जवळपास अडीच ते तीन किलोमीटर एवढे अंतर आहे.

Geeta colony to wakankar bridge distance googe map
Source: Google Map

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मध्य प्रदेश सरकारने कथितरित्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आलेली लोकवस्ती उध्वस्त केल्याचे व्हायरल दावे फेक आहेत.

व्हायरल व्हिडीओ मध्य प्रदेशातील उज्जैनच्या वाकणकर (हरी फाटक) ओव्हर ब्रीज जवळच्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचा आहे. सदर घटना आणि अतिक्रमणाची कारवाई झालेली वस्ती दोन्ही वेगवेगळ्या आहेत. दोहोंचा एकमेकांशी काहीएक संबंध नाही.

पाकिस्तान जिंदाबाद’च्या नारेबाजीची घटना नेमकी काय आहे? खरेच ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या का, हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

मुसलमानांच्या कथित ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांविरोधात हिंदूंनी रॅली काढल्याचा व्हिडीओ फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा