Press "Enter" to skip to content

सोनिया आणि राहुल गांधींसोबत ऑक्सिजन काळाबाजार प्रकरणातील आरोपी नवनीत कालरा आहे?

गेल्या शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या काळ्याबाजाराचे मोठे प्रकरण उघडकीस आणताना खान मार्केट भागातील ‘खान चाचा रेस्टॉरंट’ मध्ये छापा टाकून ५०० पेक्षा अधिक ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर जप्त केले. दिल्ली पोलिसांकडून हा छापा टाकण्यात आल्यापासूनच रेस्टॉरंटचा मालक नवनीत कालरा (navneet kalra) आपल्या कुटुंबियांसह फरार आहे.

Advertisement

दरम्यान, सोशल मीडियावर मात्र एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबरोबर एक व्यक्ती दिसतेय. दावा केला जातोय की सोनिया आणि राहुल यांच्याबरोबर दिसणारा हा व्यक्ती ‘खान चाचा रेस्टॉरंट’चा मालक नवनीत कालरा (navneet kalra) आहे.     

अर्काइव्ह फोटो

फेसबुकवर देखील हा फोटो याच कॉपीपेस्ट दाव्यांसह व्हायरल होतोय.

पडताळणी:

सर्वप्रथम तर आम्ही नवनीत कालराचे इंटरनेटवरील उपलब्ध फोटोज शोधले. या फोटोजवरून व्हायरल फोटोतील व्यक्ती नवनीत कालरा नाही हे स्पष्ट झाले. नवनीत कालराचा खालील फोटो बघून आपल्या देखील ही गोष्ट लक्षात येईल.

व्हायरल फोटोतील व्यक्ती नवनीत कालरा नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर राहुल आणि सोनिया गांधी यांच्यासह दिसणारी व्यक्ती नेमकी कोण हे शोधण्याचा प्रयत्न केला असता नवनीत कालराच्या फेसबुक अकाऊंटवरून दि. २८ जानेवारी २०१९ रोजी हा फोटो अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले.

Source: Facebook

कालराच्या फेसबुक पोस्टनुसार हा फोटो ‘टाऊन हॉल’ रेस्टॉरंट मधील असून फोटोतील व्यक्ती ऑगस्टो कब्रेरा असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

ऑगस्टो कब्रेरा खान मार्केटमधील ‘टाऊन हॉल’ या रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करतात. कब्रेरा यांचा फोटो बघून व्हायरल फोटोतील व्यक्ती ऑगस्टो कब्रेराच असल्याचं आपल्याही लक्षात येईल. 

Source: Facebook

कोण आहे नवनीत कालरा?

ऑक्सीज काळा बाजार प्रकरणात पोलिसांना हवा असणारा नवनीत कालरा दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपती आहे. दयाल ऑप्टिकल्स, खान चाचा, नेगे अँड ज्यू, टाऊन हॉल रेस्टॉरन्ट बार, मिस्टर चाऊ या सर्वांची मालकी नवनीत कालराकडे आहे. 

नवनीत कालरा याचे अनेक सेलिब्रिटीज सोबतचे फोटोज देखील आमच्या बघण्यात आले. यात भाजप नेते राजीव प्रताप रुडी, उद्योगपती मुकेश अंबानी आणि क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या सोबतच्या फोटोजचा देखील समावेश आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटोत सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह दिसणारी व्यक्ती ऑक्सिजन काळाबाजार प्रकरणातील फरार आरोपी नवनीत कालरा नसून टाऊन हॉल रेस्टॉरंटमधील शेफ ऑगस्टो कब्रेरा आहे.

हे ही वाचा-   व्हायरल फोटोतील ‘ती’ महिला सोनिया गांधी नाही, हे आहे सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा