Press "Enter" to skip to content

नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यासाठी कॉंग्रेस नेते वापरताहेत चुकीच्या विमानाचा फोटो!

देशाचे राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठीचे बोईंग 777 विमान गेल्या आठवड्यात भारतात दाखल झाले आहे. त्यानंतर आता सोशल मीडियात या विमानाचा म्हणून एका आलिशान विमानाच्या इंटेरिअरचा फोटो शेअर केला जातोय. पंतप्रधानांच्या दिमतीला असणाऱ्या 8000 करोड रुपयांच्या उडत्या झोपडीचा (narendra modi’s lavish aircraft) तो फोटो असल्याचा दावा करण्यात येतोय.

काँग्रेसच्या मीडिया पैनलिस्ट पंखुडी पाठक यांनी आपल्या प्रोफाईलवरून हा फोटो ट्विट केलाय. बातमी लिहीपर्यंत 8 हजार 800 वेळा तो रिट्विट करण्यात आलाय.

Advertisement

अर्काइव्ह लिंक

शायर आणि काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी यांनी देखील ‘इस ट्रैक्टर में तो और मस्त कुशन लगा हुआ है’ या कॅप्शनसह हा फोटो शेअर केलाय. इम्रान यांचं ट्विट देखील साधारणतः 2100 वेळा रिट्विट करण्यात आलंय.

अर्काइव्ह लिंक

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी सुरु करताना सर्वात आधी व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च केला. त्यावेळी Deerjet तसंच privatejet.com या वेबसाईटवर हे फोटोज दिसले. याच वेबसाईटवरचा फोटो वापरून कॉंग्रेस नेत्यांनी ट्विट केले आहेत.

अनेक नेटकऱ्यांनी तो फोटो आणि ते कॅप्शन कॉपी पेस्ट करून फेसबुक तसंच इतर सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

व्हायरल फोटो B-787 विमानाचा:

या फोटोजच्या मुळाशी गेल्यावर समजलं की हे विमानाच्या इंटिरियरचे (narendra modi’s lavish aircraft) फोटोज आहेत पण ‘787 ड्रीमजेट’चे. सप्टेंबर २०१६ मध्ये एका फ्रेंच डिझायनरने अडीच वर्षे काम करून या विमानाचे इंटेरिअर बनवले आहे. ही माहिती आणि विमानाच्या आतील फोटोज आपण ‘येथे‘ पाहू शकता. या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सलगपणे 17 तास प्रवास करू शकते.

पंतप्रधानासाठी येणार आहे B-777 विमान:

PTIच्या बातमीनुसार पंतप्रधान मोदी आणि इतर महत्वाच्या नेत्यांसाठी मागविण्यात आलेले आणि आता भारतात दाखल देखील झालेले विमान हे B-777 आहे.

पडताळणी दरम्यान आम्हाला ‘इंडिया टुडे’चा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये भारतात दाखल झालेल्या एअर इंडिया वनच्या ‘बोईंग 777-300 ER’च्या इंटरेरिअरचे फोटोज बघायला मिळाले. हे फोटोज व्हायरल फोटोंपेक्षा वेगळे आहेत.

Inside Air India One (Photo Credits: Poulomi Saha/India Today)

इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार विमानात एक मोठा सूट/केबिन, दोन कॉन्फरन्स रूम, प्रेस ब्रिफिंग रूम, एक मेडिकल रूम आणि जैमरसह सुरक्षित संदेशवहन प्रणाली आहे. तसेच विमानात ‘एअर-टू-एअर’ इंधन भरण्याची सुविधा देखील आहे.

Inside Air India One (Photo Credits: Poulomi Saha/India Today)

‘बोईंग 777-300 ER’ हे विमान यापूर्वीच्या बोईंग 747 विमानाची जागा घेईल. सुरुवातीच्या काळात एअर इंडियाच्या वैमानिकांच्या समन्वयाने भारतीय हवाई दलाचे वैमानिक हे विमान चालवणार आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीत हे स्पष्ट झालं की व्हायरल फोटो मोदींसाठी बनलेल्या विमानाचा नसून तो Boeing 787 च्या ‘प्रायव्हेट ड्रिमलायनर मॉडेल जेट’च्या इंटेरियरचा’ फोटो आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती-उपराष्ट्रपती यांसारख्या महत्वाच्या नेत्यांसाठी एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झालेले विमान B-777 आहे.

हे ही वाचा: नरेंद्र मोदी स्वतःहून शिक्षण सोडल्याची कबूली देतानाचा अर्धवट व्हिडीओ नव्याने व्हायरल!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा